Bollywood Actor Struggle Life: इंडस्ट्रीत डेब्यू करण्यापूर्वीच आई-वडिलांचं छत्र हरपलं, कधीकाळी 50 रुपये कमावणाऱ्या 'या' अभिनेत्यानं 6300 कोटींचं साम्राज्य उभारलं, ओळखलं का कोण?
Bollywood Actor Struggle Life: कधीकाळी तिकीटं विकून फक्त 50 रुपये कमावणाऱ्या या अभिनेत्यानं आज भारतातील कोट्यधीश असलेल्या जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत स्थान मिळवलंय.

Bollywood Actor Struggle Life: प्रत्येक पालकांना आपल्या मुलाला यशस्वी होताना पाहायचं असतं. पण, प्रत्येकाचं हे स्वप्न वास्तवात उतरतंच असं नाही. बॉलिवूडच्या (Bollywood News) या सुपरस्टारसोबत (Superstar) असंच काहीसं झालं. सिनेसृष्टीत येण्यापूर्वीच त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि त्यानं डोक्यावरचं आई-वडिलांचं छत्र गमावलं. त्यानंतर आपला उदरनिर्वाह करण्यासाठी त्यानं तिकीटं विकली आणि त्यावेळी त्याची पहिली कमाई होती, फक्त 50 रुपये. पण, आता त्याच्या एकूण संपत्तीचा विचार केला तर, त्यानं अनेक स्टार्सना मागे टाकलंय. तसेच, भारतातील कोट्यधीश असलेल्या जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत (List Of Richest Actors In The World) त्याची नोंद करण्यात आलीय.
आम्ही ज्या सुपरस्टारबाबत सांगतोय, तो दुसरा-तिसरा कुणी नसून बॉलिवूड किंग शाहरुख खान (Bollywood King Shahrukh Khan) आहे. बॉलिवूडचा किंग (Bollywood King) म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान आज अनेक चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. पण, तुम्हाला माहितीय का? शाहरुख (Shahrukh Khan) इंडस्ट्रीत येण्यापूर्वीच आई-वडील, लतीफ फातिमा खान आणि मीर ताज मोहम्मद खान यांच निधन झालं. पण, ते त्यांच्या मुलाचं यश पाहू शकले नाहीत.
आज अब्जाधीश असलेल्या शाहरुख खानच्या मनात, त्याचं यश पाहायला आई-वडीलच जगात नसल्याची खंत कायम आहे. शाहरुखनं कित्येक कार्यक्रमांमध्ये बोलताना याबाबत भाष्य केलंय. तसेच, त्यानं एका मुलाखतीत बोलताना आपल्या आईची आठवण काढलेली. तसेच, तिच्या शेवटच्या दिवसांबाबत भाष्य केलेलं. आई आयसीयूमध्ये अॅडमिट असताना त्याला कित्येक मोठ्यांनी सल्ला दिलेला की, त्यानं आईकडे जाण्याऐवजी तिच्यासाठी देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. त्यावेळी त्याला वाटलेलं की, असं केल्यानं आई बरी होईल. पण, घरातल्या लोकांनी समजावलं की, आता अशा वेळी त्यानं आईजवळ असणं गरजेचं आहे. त्यानंतर तो आईकडे गेलेला.
View this post on Instagram
शाहरुख खानची डेब्यू फिल्म कोणती?
शाहरुख खाननं 'दीवाना' फिल्ममधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेला. पण, यापूर्वी तो एका टेलिव्हिजन सीरियलमध्येही दिसलेला. दूरदर्शनवर फौजी आणि सर्कस हे दोन त्याचे पॉप्युलर शो होते. तर, शाहरुख खान एकेकाळी थिएटरमध्ये तिकीटं विकण्याचं काम करायचा. त्यावेळी तो फक्त आणि फक्त 50 रुपये कमवायचा. तेच, आज त्याचं नेटवर्ख 6300 कोटी आहे आणि तो भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे.
दरम्यान, शाहरुख खानच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, शाहरुख खान त्याची मुलगी सुहाना खानसोबत आगामी 'किंग' सिनेमात झळकणार आहे. 'किंग'नं आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं फिल्मची पहिली झलक शेअर केलेली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























