राम मंदिर स्थापनेसाठी पाचशे वर्षांचा वेळ लागणं ही शरमेची बाब, विश्व हिंदू परिषदेचे परखड मत
राम मंदिराचे आंदोलन 500 वर्षे जुने असून त्यासाठी आजवर 76 लढाया झाल्या असून साडेतीन लाख लोकांचे बलिदान झाले असल्याची आठवण परांडे यांनी करून दिली.
नागपूर : राम मंदिरासाठी (Ram Mandir) सुरुवातीपासून सर्व पक्षांनी पाठिंबा दिला असता तर आज भाजपला (BJP) फायदा मिळण्याचा विषय नसता असं विश्व हिंदू परिषदेचे (Vishwa Hindu Parishad) राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडेनी (Milind Parande) वक्तव्य केले आहे. मंदिरासाठी पाचशे वर्षांचा वेळ लागणे ही शरमेची बाब असल्याचं परखड मत परांडे यांनी व्यक्त केले आहे.
राम राष्ट्रपुरुष आहेत आणि त्यांच्या मंदिरासाठी सर्व पक्षांनी सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला असता, तर आज एकाच पक्षाला ( भाजप ) राम मंदिर विषयाचा फायदा मिळण्याचा विषयच नव्हता. मुळात 80% पेक्षा जास्त हिंदू असलेल्या देशात राम मंदिर स्थापनेसाठी पाचशे वर्षांचा वेळ लागणे ही शरमेची बाब आहे, हे आधीच व्हायला हवे होते असेही परांडे म्हणाले. लोकसभा निवडणुकांच्या पूर्वी राम मंदिर लोकार्पणाचा राजकीय फायदा भाजपला होईल का असा प्रश्न विचारल्यावर परांडेंनी हे उत्तर दिले आहे.
राष्ट्रपुरुष असलेल्या रामाचे चित्र संविधानात : मिलिंद परांडे
राष्ट्रपुरुष असलेल्या रामाचे चित्र संविधानात देखील आहे. संविधानकर्त्यांनी ही ज्या रामाला आदर्श मानले, त्या रामाचा विषय राजकीय कसा असू शकतो असे ही परांडे म्हणाले. भाजपला सत्तेत बसवण्यासाठी हे केले जात असल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. राम मंदिराचे आंदोलन 500 वर्षे जुने असून त्यासाठी आजवर 76 लढाया झाल्या असून साडेतीन लाख लोकांचे बलिदान झाले असल्याची आठवण परांडे यांनी करून दिली.
राम जन्मूभूमीवरील मंदिर हिंदूंची स्वप्नपूर्ती : परांडे
राम जन्मूभूमीवरील मंदिर हिंदूंचे स्वाभिमान होते, म्हणूनच मीर बाकीने राम जन्मभूमीचे मंदिर तोडले होते. कारण त्याला हिंदू समाजाचा अपमान करायचा होता. त्यामुळेच आज राम मंदिराचा निर्माण हिंदू स्वाभिमानाचा, अस्मितेचा आणि राष्ट्रीय आदर्शाचा विषय झाला आहे. देशात रामाचे अनेक मंदिर आहेत मात्र जन्मभूमी चा मंदिर एकच असून त्याचा थाटात लोकार्पण होऊन हिंदूंची स्वप्नपूर्ती होईल असे ही परांडे म्हणाले.
हिंदूंनी मंदिरात दान केलेलं धन फक्त हिंदूंच्या कल्याणासाठी वापरा, विश्व हिंदू परिषदेची मागणी
हिंदूंनी मंदिरात दान केलेलं धन फक्त हिंदूंच्या कल्याणासाठी वापरला पाहिजे, ज्यांची हिंदू धर्मावर श्रद्धा नाही, जे हिंदू पूजा पद्धतीला मानत नाही त्यांच्यासाठी हिंदू मंदिरात दान आलेलं धन का खर्च करण्यात यावा असा प्रश्न विश्व हिंदू परिषदेने (Vishwa Hindu Parishad) विचारला आहे. हिंदू मंदिरं आणि धार्मिक स्थळं सरकारी नियंत्रणापासून मुक्त करून हिंदू मंदिरांचे व्यवस्थापन हिंदू समाजाला सोपवले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हे ही वाचा :