Nagpur 11th Admission : पहिल्या प्रवेश फेरीअखेर अकरावीच्या 39 हजार जागा रिक्त
ज्यांनी प्रवेश नाकारला असेल ते दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरतील. मात्र ज्यांचे प्रवेश कॅप कोटामध्ये निश्चित झाले, ज्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले, ते दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरणार नाही.
नागपूरः केंद्रीय प्रवेश समितीद्वारे सुरु असलेली अकरावी प्रवेशाची पहिली फेरी शनिवारी आटोपली. पहिल्या फेरीअखेर 16,210 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. सोमवारपासून दुसरी फेरी सुरू होणार आहे. नवीन विद्यार्थ्यांसाठी प्रक्रियेअंतर्गत भाग-1ची अर्ज नोंदणी व पसंतीक्रम भरण्याची मुभा असेल तसेच द्विलक्षी अभ्यासक्रमासाठी पसंती देणे व प्रवेश घेण्यासही सुरुवात होईल.
समितीअंतर्गत असलेल्या शहरातील महाविद्यालयांमध्ये 55,320 जागा आहेत. पहिल्या फेरीअखेर कॅप राऊंडमध्ये 13,639 व कोटा अंतर्गत 2,571 असे 16,210 प्रवेश निश्चित झाले आहेत. यानंतरही 39,110 जागा शिल्लक आहेत. कॅप राऊंड व कोटा मिळून कला शाखेत 2,087 प्रवेश झाले असून 6,413 जागा रिक्त आहेत. वाणिज्य शाखेत 4,582 प्रवेश झाले असून 11,978 जागा रिक्त आहेत. विज्ञान शाखेत 8,746 प्रवेश निश्चित झाले असून 17,604 जागा रिक्त आहेत. एमसीव्हीसीमध्ये 795 प्रवेश झाले व 3115 जागा रिक्त आहेत.
दरम्यान ज्यांनी महाविद्यालय आवडले नसेल व ज्यांनी प्रवेश नाकारला असेल ते दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरतील. मात्र ज्यांचे प्रवेश कॅप कोटामध्ये निश्चित झाले आणि ज्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले, ते विद्यार्थी दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरणार नाही.
Nagpur Airport : नागपूर विमान सेवा 'रामभरोसे'; दिल्ली, मुंबईकरिता एयर इंडियाची सेवा दीर्घ काळासाठी रद्द
प्रवेशाबाबत महत्त्वाचे...
- पहिली फेरी संपल्यावर सोमवारपासून दुसरी फेरी सुरु होत आहे.
- 7-9 ऑगस्टः केंद्रीय प्रवेशासाठी भाग-2 भरणे, नवीन विद्यार्थ्यांसाठी भाग-1 सुरू, द्विलक्षी विषय प्रवेशासाठी पसंती देणे, कोटा प्रवेशासाठी अर्ज करणे.
- 10 व 11 ऑगस्टः कॅप डेटा प्रक्रिया, द्विलक्षी विषय प्रवेशासाठीच्या यादीस व्यवसाय शिक्षण अधिकाऱ्यांनी मान्यता देणे. कोटा प्रवेशासाठी अर्ज करणे.
- 12 ऑगस्टः प्रवेश फेरीसाठी अलॉटमेंट जाहीर करणे, कोटाअंतर्गंत पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी विद्यालयांची जाहीर करणे.
- 12 ते 17 ऑगस्टः पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करणे, द्विलक्षी अभ्यासक्रमासाठीही प्रवेश सुरू करणे, कोटाअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI