Nagpur News : मोठी बातमी! नागपुरातील एक्सप्लोसिव्ह कंपनीत भीषण स्फोट; दोन कामगारांचा जागीच मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची
Nagpur Blast : नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील कोतवालबड्डी येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. या परिसरातील एका एक्सप्लोसिव्ह कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची माहिती पुढे आली आहे.

Nagpur Blast : नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील कोतवालबड्डी शिवारातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या परिसरातील एका एक्सप्लोसिव्ह कंपनीमध्ये (Explosives Manufacturer Company) मोठा स्फोट (Massive Blast) झाल्याची माहिती पुढे आली आहे. एका खाजगी कंपनीत हा स्फोट झाला असून या ठिकाणी स्फोटक संबंधीत साहित्य तयार केलं जात असल्याची प्रथमिक माहिती पुढे आली आहे. मात्र, नेमका हा स्फोट कशामुळे झाला? हे अद्याप कळू शकलेले नाही.
परंतू हा स्फोट इतका भीषण होता की यात दोन कामगार मृत्युमुखी पडल्याची, तर दोघे जण जखमी झाल्याची प्रथमिक माहिती पुढे आली आहे. आज रविवार (16 फेब्रुवारी) दुपारी दोन वाजता राऊळगाव जवळच्या कोतवालबड्डी शिवारात असलेल्या एशियन फायर वर्क (Asian Explosive Fire Work) या कंपनी मध्ये फटाक्यांची वात तयार करताना ही घटना घडली आहे.
दोन कामगारांचा मृत्यू, तर दोघे जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, आज रविवार (16 फेब्रुवारी) च्या दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मात्र स्फोटाच्या वेळेला कंपनीत मोठ्या संख्येने कामगार काम करत होते. मात्र, ज्या विशिष्ट प्लांटमध्ये हा स्फोट झाला, त्या ठिकाणी चार कामगार कार्यरत होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे, तर इतर दोघे जखमी झाले आहे.
दरम्यान या परिसरात मोठ्या संख्येने स्फोटक तयार करणारे कारखाने असून त्यांच्यामध्ये अनेक वेळेला स्फोट किंवा औद्योगिक दुर्घटनेच्या घटना घडतात. त्यामुळे परिसरातील गावकऱ्यांची सुरक्षा धोक्यात येते, असा आरोप आता होत आहे. सरकार ने या परिसरातील कारखान्यांच्या कार्यपद्धतीची आणि तिथे अमलात असलेल्या सुरक्षेच्या उपायांचा आढावा घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे या मागणीचे गांभीर्य बघता यावर आता काय उपाययोजना केल्या जातात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या पुढील कारवाई पोलिसांकडून करण्यात येत आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कंपनीत 31 जण काम करत असताना ब्लास्ट, मोठा अनर्थ टळला
एशियन फायर वर्कच्या मिल बॉल युनिटमध्ये दुपारी हा ब्लास्ट झाला त्यावेळी तिथे सात ते आठ जण काम करत होते. तर स्फोटाच्या वेळेला कंपनीत 31 जण काम करत होते. दरम्यान कंपनीच्या मिल बॉल युनिटमध्ये फटाक्याची वात बनवण्याचे काम करण्यात येत होते, त्यावेळी हा स्फोट झाला असल्याचे सांगितलं जातंय. तर स्फोटानंतर कंपनीमध्ये आग लागली होती, मात्र आता ती पूर्णपणे नियंत्रणात आहे. सोबतच या कंपनीत इतर तयार मालाचा साठा देखील पूर्णपणे सुरक्षित आहे. एकूणच या घटनेत मोठा अनर्थ टळला आहे.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

