Beed News: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला दणका; महसूल प्रशासनाकडून मोठी कारवाई
Sarpanch Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) याची संपत्ती जप्त करण्याच्या प्रक्रियेला महसूल प्रशासनाकडून सुरुवात झाली आहे.

Sarpanch Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) याची संपत्ती जप्त करण्याच्या प्रक्रियेला महसूल प्रशासनाकडून सुरुवात झाली आहे. यापूर्वीच कृष्ण आंधळेला फरार घोषित केल्यानंतरच बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने कृष्ण आंधळे याची संपत्ती जप्त करण्याची परवानगी मागितली होती. दरम्यान ही मागणी न्यायालयाकडून मान्य केल्यानंतर आता या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे फरार आरोपी कृष्णा आंधळेला ता प्रशासनाकडून दणका देण्यात आल्याचे बघायला मिळाले आहे.
....मात्र फरार आरोपीला अटक कधी?- धनंजय देशमुख
तर दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी सातत्याने या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी लावून धरली आहे. मात्र अद्याप यातील मुख्य सूत्रधार मोकाटच असल्याचे धनंजय देशमुख यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणाचा जलद गतीने तपास करून मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी ही मागणी आता सर्व स्तरातून होत आहे. दरम्यान महसूल प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या या कारवाई संदर्भात प्रतिक्रिया देत असताना संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख म्हणाले की, संपत्ती तर जप्त करावीच मात्र त्याला अटक करावी अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.
परळीतील सरपंच बापू आंधळे खून प्रकरण, फरार बबन गित्तेच्या संपत्तीवर येणार टाच
परळीतील बापू आंधळे खून प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गित्ते याच्या संपत्तीची माहिती पोलिसांनी जमा केली आहे. ही संपत्ती जप्त करण्यासाठी परवानगी मागितली जाणार आहे. 29 जून 2024 रोजी परळी तालुक्यातील मरळवाडी गावचे सरपंच बापू आंधळे यांचा खून झाला होता. या प्रकरणात आठ महिन्यांपासून बबन गित्ते फरार आहे. बबन गित्ते याला अधिकृतरित्या फरार घोषित केल्यानंतर त्याच्या संपत्ती जप्तीचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहे. यासाठी त्याच्या संपत्तीची माहिती जमा केली जातेय. पुढील दोन दिवसात न्यायालयाकडे संपत्ती जप्तीसाठी परवानगी मागितली जाणार आहे. त्यामुळे बबन गित्ते याच्या संपत्तीवर टाच येणार असल्याने शरणागती शिवाय बबन गित्तेकडे पर्याय राहणार नाही.
बबन गित्ते अद्याप फरारचं!
या प्रकरणात तपास पूर्ण करून पोलिसांनी दोषारोपपत्र अंबाजोगाई न्यायालयात दाखल केलेले आहे. बबन गित्तेच्या अटकेनंतर पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान आंधळे खून प्रकरणात दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी दिल्या गेल्या होत्या. एकूण 11 जणांवर गुन्हा नोंद होता. यात वाल्मीक कराड विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न आणि कट रचल्या प्रकरणी गुन्हा नोंद आहे. मात्र परळी पोलिसांनी तपासात वाल्मीक कराडचा सहभाग नसल्याचे सांगून त्याचे नाव आरोपीतून वगळले आहे. उर्वरित आरोपी अटक असून केवळ बबन गित्ते फरार आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश
विविध आरक्षण आंदोलनाची दाहकता लक्षात घेता बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत. 15 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 वाजतापासून हे आदेश लागू केले गेले असून 1 मार्च पर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना मोर्चे निदर्शने आंदोलने धरणे करण्यासाठी जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही, असे या आदेशात म्हटले असून बीडचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी हे आदेश पारित केले आहेत.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

