Loco Pilot Termination : राजधानीचे 16 लोको पायलट काढल्याने खळबळ, विरोधानंतर आदेश परत
मुळात असिस्टंट लोको पायलट पदावर भरती केली जाते. यानंतर, मालवाहू ट्रेन लोको पायलट, नंतर प्रवासी लोको पायलट आणि शेवटी मेल एक्सप्रेस ट्रेन लोको पायलट बनविल्या जाते. यासाठी किमान 15 वर्षे लागतात.
नागपूर: गोंदियाजवळ झालेल्या रेल्वे अपघातानंतरही रेल्वे प्रशासनाने धडा घेतला नाही. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ट्रेनचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाला. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात सांगितले की, लोको पायलटला ट्रेनचा वेग नियंत्रित करता आला नाही, त्यामुळे ट्रेन मालगाडीला धडकली. या घटनेला जबाबदार असलेल्या दोन लोको पायलटनाही निलंबित करण्यात आले आहे. या घटनेनंतर मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने राजधानी आणि दुरांतो गाड्यांमधून धावणाऱ्या 2 लोको पायलटपैकी 1 लोको पायलटला काढून टाकण्याचा नवा आदेश जारी केला. नागपूर विभागांतर्गत सुमारे 16 राजधानी आणि दुरांतो गाड्या धावतात. अशा परिस्थितीत एकाच वेळी 16 लोको पायलट कमी करण्यात आले. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.
या आदेशाच्या निषेधार्थ रेल्वे युनियनचे नेते विरोध करण्यासाठी बाहेर आले. गुरुवारी वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता (ऑपरेशन) पवन जयंत यांची भेट घेऊन आदेश मागे घेण्याची मागणी केली. रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार ही कपात करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मात्र युनियनचे नेते याला प्रवाशांच्या सुरक्षेचा घोळ म्हणत होते. फेडरेशन रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी या संदर्भात बोलणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या आदेशाची तूर्त अंमलबजावणी करू नये. यानंतर पवन जयंत यांनी आदेश मागे घेतला.
NMC Elections : नागपुरात माजी नगरसेवक, अधिकारी संभ्रमातः सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर इच्छुकांमध्ये उत्सुकता
प्रवाशांची सुरक्षा धोक्यात
सीआरएमएसचे कार्याध्यक्ष वीरेंद्र सिंह यांनी सांगितले की, रेल्वेच्या नियमांनुसार 110 किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या राजधानी आणि दुरांतो ट्रेनमध्ये दोन लोको पायलटची ड्युटी लावली जाते. त्यांचे थांबे खूपच कमी आहेत, त्यामुळे सुमारे 500 किमीचा प्रवास एकाच वेळी करावा लागतो. हे अंतर कापण्यासाठी सुमारे 6 तास लागतात. सुरक्षा लक्षात घेऊन, विभागातील सर्वात वरिष्ठ लोको पायलटची कर्तव्ये लादली जातात. लोको पायलटची सुपर सायको टेस्ट असते, ती उत्तीर्ण झाल्यावर त्यांना ही जबाबदारी सोपवली जाते. अलीकडेच राजधानी आणि दुरांतो गाड्या ताशी 130 किमी वेगाने चालवण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे, तर दुसरीकडे 1 लोको पायलट काढून टाकण्यात येत आहे.
MP Flood : मध्य प्रदेशातील पूरग्रस्तांच्या मदतीला नागपुरातून पाठवले एमआय-17, व्ही-5 हेलिकॉप्टर
लोको पायलट होण्यासाठी लागतात 15 वर्ष
रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदावर भरती केली जाते. यानंतर, मालवाहू ट्रेन लोको पायलट, नंतर एक प्रवासी लोको पायलट आणि शेवटी मेल एक्सप्रेस ट्रेन लोको पायलट बनविल्या जाते. इथपर्यंत पोहोचण्यासाठी किमान 15 वर्षे लागतात. या दरम्यान अनेक प्रकारचे प्रशिक्षण आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागतात. याशिवाय 110 किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या ट्रेनमध्ये तैनात होण्यासाठी मेडिकलची सुपर सायको टेस्ट उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. रेल्वेच्या नव्या आदेशानुसार लोको पायलटऐवजी असिस्टंट लोको पायलटवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सहाय्यक लोको पायलट प्रशिक्षित नसतात आणि सुपर सायको टेस्टही उत्तीर्ण होत नाहीत, असे रेल्वे युनियनच्या नेत्यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत प्रशिक्षित लोको पायलटऐवजी अप्रशिक्षित असिस्टंट लोको पायलटची नियुक्ती करणे पूर्णपणे अन्यायकारक आहे.