एक्स्प्लोर
नागपुरात पाणीपुरवठा करणारे 120 टँकर बंद करण्याचा महापालिकेचा निर्णय
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात महापालिका प्रशासनाने नागपुरात पाणीपुरवठा करणारे 120 टँकर बंद करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे पालिकेचे वर्षाला सुमारे 10 ते 11 कोटी वाचणार आहेत.
नागपूर : नागपुरात पाणीपुरवठा करणारे 120 टँकर बंद करण्याचा निर्णय आयुक्त तुकामराम मुंडे यांच्या नेतृत्वात पालिकेने घेतला आहे. यामुळे पालिकेचे वर्षाला सुमारे 10 ते 11 कोटी वाचणार आहेत. परंतु, अनेक टँकर्स नगरसेवकांच्या जवळच्या लोकांचे असल्याने प्रशासन आणि नगरसेवक यांच्यातला वाद वाढण्याची शक्यता आहे. नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी येऊन तुकाराम मुंढे यांना महिना पूर्ण होत आहे. या महिन्यात तुकाराम मुंढे यांनी कामाचा धडाका लावलाय. आधी कर्मचाऱ्यांना शिस्त, शहरातील अनाधिकृत बांधकामावर हातोडा अन् आता टँकर्स बंद करण्याचा निर्णय मुंढे यांनी घेतलाय.
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात महापालिका प्रशासनाचा निर्णय -
नागपूर शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या 346 टँकर्सपैकी 120 टँकर्स बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महानगरपालिकेतर्फे घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पाणी पुरवठ्यासाठी खर्च होणाऱ्या निधीची मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे. नागपूर शहरात जलवाहिनी नसलेल्या भागांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. मनपातर्फे सद्यस्थितीत 346 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येते. या टँकर्सवर दरवर्षी 28 कोटी रुपये खर्च होतो. 120 टँकर्स बंद करण्यात आल्याने दरवर्षी सुमारे 10 ते 11 कोटी रुपये खर्चाची बचत होणार आहे.
नागपूर महापालिकेत 'साडे नऊ म्हणजे साडे नऊच'...
या निर्णयाने नगरसेवक, प्रशासन यांच्यात वाद होण्याची शक्यता -
तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात प्रशासनाचा हा निर्णय नगरसेवक आणि प्रशासन यांच्यात वादाचा कारण बनू शकतो. कारण अनेक टँकर्स नगरसेवकांच्या जवळच्या लोकांचे असल्याने त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत बंद होऊन ते या विषयावर नाराजी व्यक्त करू शकतील.
नागपूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तुकाराम मुंढे अन् नगरसेवकांमध्ये कलगीतुरा
नागपूर महापालिकेत कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे -
शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असणारे तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेचे आयुक्तपदी येऊन एक महिना पूर्ण झालाय. या एका महिन्यात तुकाराम मुंढे यांनी पालिकेत कामांचा धडाका सुरू केलाय. यात सर्वात महत्वाचं म्हणजे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. कार्यालयीन वेळेच्या आत कार्यालयात येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रमाण 59 टक्क्यावरुन 95 टक्क्यांपर्यंत वाढलंय. विशेष म्हणजे वेळेत कार्यालयात आल्याने समाधान वाटत असल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.
Nagpur Corporation | धावत...पळत... पण वेळेवर कामावर! आयुक्त तुकाराम मुंढेंचा इम्पॅक्ट | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement