एक्स्प्लोर

नागपूर महापालिकेत 'साडे नऊ म्हणजे साडे नऊच'...

नागपूर महानगरपालिकेत सकारात्मक बदल झाला असून कार्यालयीन वेळेसाठी "साडे नऊ म्हणजे साडे नऊ" हेच नवं घोषवाक्य झालंय.

नागपूर : शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असणारे तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेचे आयुक्तपदी येऊन एक महिना पूर्ण झालाय. या एका महिन्यात तुकाराम मुंढे यांनी पालिकेत कामांचा धडाका सुरू केलाय. यात सर्वात महत्वाचं म्हणजे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. कार्यालयीन वेळेच्या आत कार्यालयात येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रमाण 59 टक्क्यावरुन 95 टक्क्यांपर्यंत वाढलंय. विशेष म्हणजे वेळेत कार्यालयात आल्याने समाधान वाटत असल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. जानेवारी महिन्यात सकाळी साडेनऊच्या कार्यालयीन वेळेच्या आत कार्यालयात येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रमाण 59 टक्केच होते. म्हणजेच तेव्हा तब्बल 41 टक्के कर्मचारी उशिरा यायचे. 28 जानेवारीला तुकाराम मुंढे हे महापालिका आयुक्त म्हणून रुजू झाले. आज त्यांना एक महिना पूर्ण झालाय. या एका महिन्यात वेळेत येणाऱ्यांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. फेब्रुवारी महिन्यात सरासरीने 95 टक्के अधिकारी, कर्मचारी वेळेत म्हणजेच साडेनऊच्या आधीच कार्यालयात येत आहेत. जेव्हा फायर ब्रँड अधिकारी तुकाराम मुंढे डम्पिंग ग्राऊंडला अचानक भेट देतात काही विभागात तर हे प्रमाण 100 टक्के आहे, तर इतर काही विभागात 90 टक्क्यांच्यावर अधिकारी व कर्मचारी वेळेत येत आहे.(सरासरी 95 टक्के आहे ). सकाळी धावपळ करत लगबगीने अधिकारी, कर्मचारी कार्यालय गाठत आहेत. अनेकांची तारांबळ उडत आहे. मात्र, हे अनुशासन चांगले आहे. आम्हालाच बरे वाटत असल्याचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मुंढे आल्यानंतर किमान महापालिकेतील प्रशासनात एक शिस्त येत असून साडेनऊ म्हणजे साडेनऊ, हेच नवे घोषवाक्य महापालिकेत ऐकायला येत आहे. तुकाराम मुंढेंची शाळा, शिवजयंती कार्यक्रमात मोबाईल वाजल्याने जप्त तर जीन्स घातलेल्या कर्मचाऱ्याला झापले विशेष कार्यक्रमावेळी अधिकारी कर्मचाऱ्यांना हजर राहावेच लागेल - मुंढे मुंढे यांनी काही दिवसांपूर्वी महापुरूषांच्या जयंती वा पुण्यतिथी कार्यक्रमावेळी अधिकारी कर्मचाऱ्यांना हजर राहावेच लागेल, असे परिपत्रक काढले होते. त्याचा परिणाम म्हणून सुटी असतानाही अनेक वर्षानंतर महापालिकेत महापुरूषांच्या जयंती कार्यक्रमात मनपा कर्मचारी शिस्तीने हजर होते. यावेळी मुंढे म्हणाले की, कर्त्यव्य प्रत्येक कर्मचाऱ्याने जाणून घ्या. कर्तव्यापेक्षा आपल्या भूमिका महत्वाच्या आहेत. मात्र, आपण भूमिकेपासून दूर आहे. आपल्या भूमिका म्हणजे नागपूरच्या समस्या सोडवणे. नागपूर शहराचा विकास करण्यासाठी, नागरिकांना सुविधा चांगल्या मिळाव्या हे आपले कर्तव्य असावे. मात्र, आपलं कर्तव्य पूर्ण होताना दिसत नाही, असं ते म्हणाले होते. Nagpur | गुंड संतोष आंबेकरचा अलिशान बंगला जमिनदोस्त, नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंढेंची कारवाई | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Big Fight Vidarbh : प्रचारानंतरचा विचार काय? पश्चिम विदर्भात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणालाBig Fight Vidarbh : विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांच्या मतदारसंघात बिग फाईटBig Fight Vidarabh Vidhansabha : नंदुरबार, नवापूर, सिंदखेडा विदर्भाच्या बिग फाईटShrikant Shinde Rally | प्रचाराचा शेवटचा दिवस, महायुतीसाठी श्रीकांत शिंदेंचा रोडशो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Embed widget