MC Election And Exam : महानगरपालिकांच्या निवडणुकीचा विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षेवर परिणाम; परीक्षांचे वेळापत्रक बदलण्याची वेळ
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. निवडणुकीच्या कार्यक्रमाचा थेट परिणाम आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेवर झाल्याचे बघायला मिळतं आहे.

Nagpur Municipal Corporation Elections 2026 : राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा (Election 2026) कार्यक्रम जाहीर केला. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील महापालिकेच्या निवडणूका जाहीर केल्या आहेत. मुंबईसह राज्यातील एकूण 29 महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. त्यामुळे कालपासून (15 डिसेंबर 2025) आचारसंहिता लागू झाली आहे. (Election Marathi News) तर दुसरीकडे निवडणुकीच्या कार्यक्रमाचा थेट परिणाम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) हिवाळी परीक्षेवर (Election And Exam) झाल्याचे बघायला मिळतं आहे.
Exam Schedule Changed : 14, 15 आणि 16 जानेवारी रोजी नियोजित असलेल्या हिवाळी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेतील 14 ते 16 जानेवारी दरम्यान होणाऱ्या परीक्षांच्या वेळापत्रक बदलण्याची वेळ आली आहे. 15 जानेवारीला महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. यादरम्यान, निवडणूक कामासाठी विद्यापीठाच्या अध्यापन व अशैक्षणिक कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नियुक्ती करावी लागते. मतदान केंद्रावर ड्युटी लागलेल्या कर्मचाऱ्यांना 14 जानेवारीपासूनच त्यांच्या मतदान केंद्रावर हजर राहावे लागते. तर काहींना मतमोजणीच्या दिवशी उशिरापर्यंत थांबावे लागते. तो अंदाज घेऊनच विद्यापीठ प्रशासनाने 14, 15 आणि 16 जानेवारी रोजी नियोजित असलेल्या हिवाळी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याची तयारी सुरू केली आहे.
यापूर्वीच विद्यार्थ्यांनी नोंदवला होता आक्षेप
दरम्यान, यापूर्वीच काही विद्यार्थ्यांनी 14 जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी परीक्षा घेण्यास आक्षेप नोंदवला होता. आता निवडणुकीमुळे फक्त 14 नाही तर 15 आणि 16 तारखेचे वेळापत्रकही बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे आधीच विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा उशिराने होत असताना त्यामध्ये आणखी उशीर होण्याची शक्यता आहे.
MC Election News: विदर्भातील निवडणुका आणि एकूण जागा
1. नागपूर – 151
2 अकोला - 80
3 अमरावती - 87
4 चंद्रपूर - 66
Municipal Corporations Election Schedule : असा असेल महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम?
⦁ नामनिर्देशन पत्र स्वीकारणे - 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
⦁ अर्जाची छाननी - 31 डिसेंबर
⦁ उमेदवारी माघारीची मुदत - 2 जानेवारी
⦁ चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी - 3 जानेवारी
⦁ मतदान - 15 जानेवारी
⦁ निकाल - 16 जानेवारी
एकूण मतदार - 3.48 कोटी
एकूण मतदार केंद्र - 39,147
मुंबईसाठी मतदार केंद्र - 10,111
कंट्रोल यूनिट - 11,349
बॅलेट यूनिट - 22,000
हेही वाचा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI























