एक्स्प्लोर
शिवडी रेल्वे स्थानकावर तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी
रेल्वे प्रशासन आणि अनेक सामाजिक संस्था या नेहमीच जनजागृती करत असतात. जीवघेणे स्टण्ट न करण्याचे आवाहन करत असतात. परंतु त्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही.
मुंबई : मुंबईची 'लाईफलाईन' असलेल्या मुंबई लोकलला 'डेडलाईन' बनवण्यासाठी काही जण कारणीभूत ठरत आहेत. लोकलच्या दरवाज्यात उभे राहून स्टण्ट करणारे तरुण हे त्यामागचं सर्वात मोठं कारण ठरत आहेत. हे तरुण लोकलमध्ये स्टण्ट करुन स्वतःचे आणि त्यांच्या सहप्रवाशांचा जीव धोक्यात घालतात. आज पुन्हा एकदा लोकलमध्ये स्टण्ट करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ समोर आला आहे.
हार्बर रेल्वे मार्गावरील शिवडी रेल्वेस्थानकावर एक तरुण स्टण्ट करतानाचा व्हिडीओ समाज माध्यमांत व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, हा तरुण फलाटावरुन पाय घासत जातो. फलाट संपल्यानंतर रेल्वे रुळालगतच्या झाडांना हाताने स्पर्श करण्याचा प्रयत्न करताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमुळे आता तरी रेल्वे प्रशासन या स्टण्टबाज युवकांवर कारवाई करणार का? असा सवाल प्रवासी विचारत आहेत.
व्हिडीओ पाहा
रेल्वे प्रशासन आणि अनेक सामाजिक संस्था या नेहमीच जनजागृती करत असतात. जीवघेणे स्टण्ट न करण्याचे आवाहन करत असतात. परंतु त्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. त्यामुळे आता पालकांनीदेखील त्यांच्या मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
शिक्षण
महाराष्ट्र
बॉलीवूड
Advertisement