एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोदीजी, कोहलीचं चॅलेंज स्वीकारलं, आता माझंही स्वीकारा: राहुल गांधी
केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी सोशल मीडियावरुन ‘फिट इंडिया’ मोहिम सुरु केली आहे. यावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुंबई: देशभरात सुरु असलेल्या फिटनेस चॅलेंजवरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
राहुल गांधींनी ट्विट करुन मोदींना अनोखं चॅलेंज दिलं आहे.
“मोदीजी, तुम्ही विराट कोहलीचं चॅलेंज स्वीकारल्याचं पाहून आनंद झाला. आता माझंही एक चॅलेंज स्वीकारा. पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करा, किंवा काँग्रेस देशभरात करत असलेल्या आंदोलनात सहभागी व्हा. प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत” असं ट्विट करत राहुल गांधींनी मोदींना चॅलेंज दिलं आहे.
फिटनेस चॅलेंज
केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी सोशल मीडियावरुन ‘फिट इंडिया’ मोहिम सुरु केली आहे. त्यासाठी स्वत: व्यायाम करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर व्यायाम करत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करा, असं आवाहन करत, राज्यवर्धनसिंह राठोड यांनी विविध सेलिब्रिटींना चॅलेंज दिलं.
राज्यवर्धनसिंह राठोड यांनी विराट कोहली, हृतिक रोशन आणि सायना नेहवाल यांना हे चॅलेंज दिलं होतं. या तिघांनीही ते पूर्ण करत, इतरांना नॉमिनेट/नामांकित केलं. कोहलीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, महेंद्रसिंह धोनी आणि पत्नी अनुष्का शर्मा यांना नॉमिनेट करत चॅलेंज दिलं.
कोहलीचं हे चॅलेंज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वीकारल्याचं ट्विट केलं. त्यानंतर राहुल गांधींनी हीच संधी साधन पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन निशाणा साधला.
सलग 11 दिवस पेट्रोल-डिझेल दरवाढ
सलग 11 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यानं मोदी सरकारविरोधात तीव्र संतापाची लाट उमटताना दिसत आहे. आज पुन्हा पेट्रोल 30 पैसे तर डिझेलचा दर लीटरमागे 20 पैशांनी वाढला आहे.
मुंबईत वाढलेल्या दरानुसार पेट्रोलचे दर 85.29 इतके झाले आहेत. तर अमरावती शहरातल्या पेट्रोलचा दर हा संपूर्ण भारतात सर्वाधिक आहे. अमरावतीत पेट्रोलचा दर लिटरमागे 86.52 तर डिझेलचा दर 74.11 इतका आहे.
संबंधित बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement