मुंबईत बसून यूपीत गुंतवणुकीचा मुख्यमंत्री योगींचा प्लॅन, आज बॉलिवूडसह उद्योग क्षेत्रातील दिग्गजांच्या भेटीगाठी
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बॉलिवूडच्या अभिनेते आणि निर्मात्यांशी तसेच महाराष्ट्र आणि मुंबईतील उद्योजकांशी चर्चा करणार आहेत. सीएम योगी यांचा देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईचा हा दौरा अनेक अर्थांनी खास आहे.
मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बॉलिवूडच्या अभिनेते आणि निर्मात्यांशी तसेच महाराष्ट्र आणि मुंबईतील उद्योजकांशी चर्चा करणार आहेत. सीएम योगी यांचा देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईचा हा दौरा अनेक अर्थांनी खास आहे. चार मोठे अजेंडे घेऊन मुख्यमंत्री मुंबईच्या या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. काल अभिनेता अक्षयकुमारच्या भेटीने सुरु झालेला हा दौरा आज बॉलिवूडसह अनेक उद्योजकांच्या भेटीने संपणार आहे. उद्योग जगतातील टॉप 100 उद्योजकांशी मुख्यमंत्री योगी आज चर्चा करणार आहेत.
उत्तर प्रदेशच्या विकासासाठी मुख्यमंत्री योगी यांच्या या भेटीगाठी आहे. सीएम योगी नोयडामध्ये प्रस्तावित होत असलेल्या फिल्मसिटीच्या रुपरेषेवर बॉलिवूडमधील दिग्गजांशी चर्चा करणार आहेत. मंगळवारी मुख्यमंत्री योगींनी अभिनेता अक्षयकुमारची भेट घेतली. आज ते बॉलिवूडमधील जवळपास 50 निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांशी भेटणार आहेत.
'मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला ठग!', मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांविरोधात मनसेची पोस्टरबाजी
सोबतच योगी डिफेंस सेक्टरमधील प्रसिद्ध लोकांच्या देखील भेटी घेणार आहेत. आज मुंबईत मुख्यमंत्री योगी संरक्षण उत्पादनांशी निगडित कंपन्या आणि त्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. सोबतच अनेक उद्योजकांना देखील ते भेटणार आहेत. या बैठकीमध्ये के उत्तर प्रदेश सरकारकडून गुंतवणूकदारांना देण्यात येणाऱ्या सुविधा तसेच अनुदान अशा गोष्टींची माहिती देखील देणार आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये फिल्म सिटी उभारण्यासाठी CM योगी आदित्यनाथ मुंबईत कलाकार, दिग्दर्शकांशी चर्चा
या उद्योजकांना भेटणार सीएम योगी आदित्यनाथ
सीएम योगी आदित्यनाथ आपल्या मुंबई दौऱ्यात एन चंद्राशेखरन चेअरमन टाटा सन्स, डॉ निरंजन हीरानंदानी चेअरमन हीरानंदानी ग्रुप, एसएन सुब्रमणयम, चेअरमन एलअॅंडटी, संजय नायर चेअरमन केकेआर इंडिया अॅडवायझर्स, सुप्रकाश चौधरी सीईओ सिमंस इंडस्ट्री, बाबा कल्याणी, चेअरमन भारत फोर्ज लिमिटेड, जसपाल बिंद्रा, चेअरमन सेंट्रम कॅपिटल लिमिटेड अमित नायर, व्हाईस प्रेसिडेंट वन 97 कम्यूनिकेशन्स, विकास जैन एके कॅपिटल सर्व्हिसेस, वरूण कौशिक असोशिएट डायरेक्टर एके कॅपिटल सर्व्हिसेस यांच्याशिवाय डिफेंस सेक्टरमधील प्रसिद्ध उद्योजक एसपी शुक्ल चेअरमन एफआयसीसीआय डिफेंस अॅंड एरोस्पेस कमेटी, सुकरन सिंह, सीईओ व एमडी टाटा अॅडवांस सिस्टम, सुशील कुमार एवीपी व हेड गर्व्हनमेंट इनोवेशन अॅंड स्किल डेवलपमेंट टाटा टेक्नोलॉजी, हर्षवर्धन गुणे हेड डिफेंस टाटा टेक्नोलॉजी, अशोक वाधवान चेअरमन पीएलआर सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड, टीएस दरबारी, सीईओ व एमडी टॅक्समॅको डिफेंस सिस्टम, आशीष राजवंश हेड डिफेंस अडानी डिफेंस, रजत गुप्ता, हेड डिफेंस बिजनेस अशोक लेलॅंड, कर्नल आरएस भाटिया (रिटायर्ड), प्रेसिडेंट डिफेंस भारत फोर्ब, जेडी पाटील होल टाईम डायरेक्टर व मेंबर ऑफ बोर्ड एल अॅंड टी, विजय सुजान, सीईओ जेएनवी व्हेंचर्स इंडिया यांना योगी आदित्यनाथ भेटणार आहेत.