एक्स्प्लोर

कोरोनामुक्त झालेल्यांना 'गुलियन बॅरी सिंड्रोम' या दुर्मिळ आजाराचा धोका!

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये सध्या गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) हा दुर्मिळ आजार आढळून येत आहे. हा आजार आढळलेल्या 49 वर्षीय महिलेवर मुंबईतील परळ येथील ग्लोबल रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले.मुंबईत आतापर्यंत 25 रुग्णांची नोंद झाली आहे. पण 'गुलियन बॅरी सिंड्रोम' म्हणजे काय? या आजारात नेमकं काय होतं?

मुंबई : कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये सध्या गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) हा श्वसनाशी संबंधित दुर्मिळ आजार आढळून येत आहे. मुंबईतील एका 49 वर्षीय कोरोनाबाधित महिलेला गुलियन बॅरी सिंड्रोम हा आजार असल्याचे निदान झाले होते. कोरोनामुक्त रुग्णाला हा आजार होणं हे दुर्मिळात दुर्मिळ आहे. परळ येथील ग्लोबल रुग्णालयातील डीबीएस प्रोग्रामचे सीनियर कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट डॉ. पंकज अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली अन्य डॉक्टरांच्या टीमने या महिलेवर यशस्वी उपचार केले आहेत. या महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने 26 ऑक्टोबर रोजी तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

49 वर्षीय माधवी धारिया ही महिला रायगड जिल्ह्यातील महाड शहरात राहणारी आहे. या महिलेला कोरोना व्हायरसची लागण झाली होती. या आजाराची सौम्य लक्षणं असल्याने या महिलेवर आणि तिच्या पतीवर घरीच उपचार करण्यात आले. परंतु तीन आठवड्यानंतर तिला पाठदुखीचा त्रास सुरु झाला. ऑर्थोपेडिक सर्जनद्वारे औषधोपचार सुरु होते. पण काही दिवसांनी चेहऱ्यांच्या एका बाजूला पक्षाघात झाला होता. या महिलेला चालता येत नव्हतं. प्रकृती बिघडत असल्याचे लक्षात घेता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कुटुंबियांनी तिला मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात दाखल केलं.

परळ येथील ग्लोबल रुग्णालयातील डीबीएस प्रोग्रामचे सीनियर कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट डॉ. पंकज अग्रवाल यांनी सांगितले की, "या महिलेला चालता येत नसल्याने व्हीलचेअरवर रुग्णालयात आणले होते. चेहऱ्यावर अशक्तपणा जाणवत होता, हातांनी काहीही पकडता येत नव्हतं, बोलताना शब्दही स्पष्ट उच्चारता येत नव्हते. अशा स्थितीत या महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. या चाचणी अहवालात महिलेला गुलियन बॅरी सिंड्रोम हा विकार असल्याचं निष्पन्न झालं.

"गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) हा एक दुर्मिळ विकार आहे. मुळात, रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्यास संसर्गजन्य आजाराची पटकन लागण होते. परंतु, हा आजार रोगप्रतिकारक शक्तीने केलेल्या हल्ल्यामुळे होतो. मज्जातंतू हळूहळू निकामी करुन या आजाराचा विषाणू बोटं, पाय, हात आणि फुफ्फुसं आणि श्वसननलिकेवरही हल्ला चढवतो. अशावेळी रुग्णांची अवस्था पक्षाघात म्हणजे लकवा आल्यासारखी होते. जीबीएस हा आजार श्वसन किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कोणत्याही व्हायरल इन्फेक्शनमुळे होऊ शकते," असेही डॉ. अग्रवाल यांनी सांगितले.

कोरोनामुक्त झालेल्यांना 'गुलियन बॅरी सिंड्रोम' या दुर्मिळ आजाराचा धोका!

डॉ. अग्रवाल पुढे म्हणाले, "वेळेवर निदान आणि उपचार झाल्यास रुग्ण यातून बरा होऊ शकतो. यावर रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी इंजेक्शनचा कोर्स पाच दिवस दिला जातो. या उपचारानंतर 10 दिवसांनी रुग्ण घरी जाऊ शकतो."

"गुलियन बॅरी सिंड्रोम हा आजार मेंदू, हृदय, मूत्रपिंड आणि फुफ्फुस यांच्यासारख्या अवयवांवर परिणाम करतो. कोरोनाच्या काळात जीबीएस प्रकरणांची संख्या वाढत आहे. ग्लोबल रुग्णालयात मागील चार महिन्यात अशी तीन प्रकरणं समोर आलेली आहेत. तर मुंबईतील न्यूरोलॉजिस्टने आतापर्यंत किमान 25 प्रकरणे पाहिली आहेत", असेही डॉ. अग्रवाल यांनी सांगितले.

मुंबईतील ग्लोबल रूग्णालयातील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विवेक तलौलीकर म्हणाले की, "सार्स आणि कोविड-19 हा विषाणू फुफ्फुसावर परिणाम करतो. परंतु, या विषाणूमुळे मानवी शरीरातील अवयवांसह मेंदूवर घातक करतोय. या आजाराचे वेळीच निदान आणि उपचार होणं गरजेचं आहे. सध्या आम्ही मेंदूविकाराशी आणि हृदयासंबंधी तक्रार करत असलेल्या रुग्णांची वाढती संख्या पाहत आहोत. त्यामुळे कुठल्याही त्रास होत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या."

रुग्ण माधवी धारिया म्हणाल्या की, "कोरोनामुळे मला पक्षाघात झाला होता. डॉ. अग्रवाल यांनी वैद्यकीय चाचणीत गुलियन बॅरी सिंड्रोम हा आजार असल्याचे निदान झाले. मला चालतानाही येत नव्हतं. परंतु, डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे मला नव्याने आयुष्य मिळाले आहे. मी सर्वांना विनंती करते की आपली कोविड स्थिती लपवू नये आणि त्यासाठी योग्य ते उपचार घ्यावेत."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Maharashtra Assembly Election 2024 : मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे नेणारा उत्सव;सर्व मतदारांनी सहभागी व्हा - शिंदेSanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्यSharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Maharashtra Assembly Election 2024 : मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
Praniti Shinde : प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
Embed widget