एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
देशभरातील महिला खासदारांची भायखळा 'जेल भेट'
मुंबई: मुंबईतील भायखळा जेलमध्ये झालेल्या मंजुळा शेट्येहत्याप्रकरणाची दखल महिला आयोगानंतर आता महिला खासदारांनीही घेतली.
देशभरातील सुमारे 30 महिला खासदारांनी आज भायखळा महिला कारागृहाला भेट दिली. महिला कैद्यांचे प्रश्न आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर ही भेट होत आहे.
आसामच्या खासदार बिजॉय चक्रवर्ती यांच्या नेतृत्त्वात महिला खासदारांचं पथक आज सकाळी भायखळा जेलमध्ये दाखल झालं.
जेलला भेट देणाऱ्या खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, भाजप खासदार रक्षा खडसे, एम के कनीमोळी यांचा समावेश आहे.
मंजुळा शेट्येचा जेलर मनीषा पोखरकर आणि महिला कॉन्स्टेबल बिंदू नाईकडे, वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे, आरती शिंगणे यांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. याप्रकरणी सर्व आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटकही करण्यात आली आहे.
मंजुळा शेट्ये हत्या: स्वाती साठेंचा व्हॉट्सअॅप मेसेज, आरोपींनाच पाठिंबा
काय आहे नेमकं प्रकरण?
भायखळा जेलमधील मंजुळे शेट्ये या महिलेचा शनिवार (24 जून 2017) मृत्यू झाला होता. अधिकाऱ्याच्या मारहाणीनंतर मंजुळे शेट्येचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.
महिला कैद्याच्या हत्येपूर्वी तिच्यावर सहा महिला अधिकाऱ्यांकडून लैगिंक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंजुळा शेट्ये हिच्याकडून दोन अंडी व पाच पावांचा हिशेब लागत नसल्याचे निमित्त करून तिला मारहाण करण्यात आली. एका बॅरेकमध्ये मंजुळाला नग्न करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली तसेच तिचा लैंगिक छळही करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
Exclusive : मंजुळा शेट्येवर अनन्वित अत्याचार आणि मारहाण!
या प्रकारानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धीर देत महिला कैद्यांना बोलतं केलं. तेव्हा इतर महिला कैद्यांनी घडल्या प्रकाराची माहिती त्यांना दिली. त्यानंतर एका महिला कैद्याच्या तक्रारीवरुन नागपाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
तक्रारीत कैदी महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. आता पोलीस त्या अनुषंगाने तपास करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणातील साक्षीदारांना तपास पूर्ण होईपर्यंत अन्य कारागृहात हलवण्यात यावे अशी मागणी शेट्ये कुटुंबीयांनी केली आहे. संबंधित बातम्या मंजुळा शेट्ये हत्या: स्वाती साठेंचा व्हॉट्सअॅप मेसेज, आरोपींनाच पाठिंबा Exclusive : मंजुळा शेट्येवर अनन्वित अत्याचार आणि मारहाण! भायखळा जेलमध्ये महिला कैद्याचा संशयास्पद मृत्यू भायखळा जेलमध्ये हत्येपूर्वी महिला कैद्यावर लैंगिक अत्याचार मंजुळा शेट्येंवर निर्भयासारखेच अत्याचार, इंद्राणी मुखर्जीचा गंभीर आरोप महिला कैदी मृत्यू प्रकरण : महिला आयोगाकडून सुमोटो तक्रार दाखलअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्रिकेट
धाराशिव
राजकारण
Advertisement