एक्स्प्लोर
लाखोंच्या ड्रग्जसह महिलेला बेड्या, अंमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई
कुर्ला येथील घरी अंमली पदार्थविरोधी पथकाला 2 किलो 700 ग्रॅम चरस ज्याची किंमत 54 लाख इतकी असून रोख रक्कम 9 लाख 45 हजार रुपये सापडले आहेत.
मुंबई : एकीकडे मुंबईत एनसीबी ड्रग्स माफियांवर धडक कारवाई करीत असताना मुंबई पोलिसांचे अंमली पदार्थ विरोधी पथके देखील मुंबईत ठिकठिकाणी कारवाई करत ड्रग्स माफियांच्या मुसक्या आवळून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करत आहेत. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या घाटकोपर युनिटने अशाच प्रकारे वांद्रे लिंकिंग रोड येथून एका महिलेला दहा लाख रुपये किंमतीच्या एमडी ड्रग्ससह बेड्या ठोकल्या आहेत.
नजमा अहमद शेख असे या महिलेचे नाव असून ती माहीमच्या जनता सेवक सोसायटीमध्ये राहते. घाटकोपर युनिटच्या पोलीस निरीक्षक लता सुतार यांना ही महिला एमडी विक्री करण्यास येणार असल्याची माहिती मिळाली होती. यावरून घाटकोपर युनिटने सापळा रचून तिला अटक केली. तिच्याकडून त्या ठिकाणी 100 ग्रॅम एमडी ज्याची किंमत 10 लाख इतकी असून रोख रक्कम 20 हजार रुपये देखील मिळाली. तसेच पोलिसांनी तिच्या कुर्ला येथील घरी झडती घेतली असता त्यांना 2 किलो 700 ग्रॅम चरस ज्याची किंमत 54 लाख इतकी असून रोख रक्कम 9 लाख 45 हजार रुपये सापडले आहेत.
या महिलेकडून पोलिसांना एकूण 76 लाख 65 हजार रुपयांचे ड्रग्ज आणि रोख रक्कम मुद्देमाल हाती लागला आहे. ही महिला मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणत ड्रग्जची विक्री आणि पुरवठा करीत होती. तिने इतक्या मोठ्या प्रमाणत ड्रग्ज कुठून आणले होते? ते कोणाला विक्री करीत होती? याचा तपास अंमली पदार्थ विरोधी पथक करीत आहेत.
संबंधित बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement