एक्स्प्लोर
...आणि पतीने भाजी चिरण्याच्या चाकून पत्नीला संपवलं!
पत्नीच्या घरी बहिणीचे लग्न असल्याने पैशाच्या देवाण-घेवाणीतून त्यांच्यात काही दिवसापासून वाद सुरु होता. याच रागातून बिरबलने काल रात्री तिचा घरातील भाजी चिरण्याच्या चाकूने गळा चिरला.

भांडुप : भांडुपच्या तुलशेतपाडा भागात पतीने पत्नीची हत्या केली आणि चोराने पत्नीची हत्या केल्याचा बनाव रचल्याचे घटना घडली. मृत पत्नीचे नाव नेहा गुप्ता असून आरोपी पतीचे नाव बिरबल गुप्ता असे आहे. नेहा आणि बिरबल यांचा दहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. गुप्ता दाम्पत्याला तीन लहान मुली आहेत. परंतु गेल्या काही दिवसापासून त्यांच्यात छोट्या-मोठ्या कारणांवरुन भांडणे होत होती. पत्नीच्या घरी बहिणीचे लग्न असल्याने पैशाच्या देवाण-घेवाणीतून त्यांच्यात काही दिवसापासून वाद सुरु होता. याच रागातून बिरबलने काल रात्री तिचा घरातील भाजी चिरण्याच्या चाकूने गळा चिरला. सकाळी घरात चोर शिरले आणि त्यांनी पत्नीची हत्या केल्याची ओरड बिरबले केली. परंतु भांडुप पोलिसांनी कसून चौकशी केली असता, पतीनेच पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे.
Before You Go
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















