एक्स्प्लोर
Advertisement
पेडर रोडवर 'अशा' पद्धतीने मुकेश अंबानींनी नीता यांना प्रपोज केलं होतं...
पेडर रोडवर भररस्त्यात ट्राफिकमध्ये गाडी थांबवून मुकेश अंबानींनी नीता यांना लग्नाची मागणी घातली होती. 'रांदेव्हू विथ सिमी गरेवाल' या कोणे एके काळच्या सुप्रसिद्ध टॉक शोमधला हा किस्सा पुन्हा वायरल झाला आहे.
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी हे देशातलं अब्जाधीश जोडपं. मुकेश अंबानी यांनी नीता यांना कसं प्रपोज केलं, हे सांगतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे. पेडर रोडवर भररस्त्यात ट्राफिकमध्ये गाडी थांबवून मुकेश अंबानींनी नीता यांना लग्नाची मागणी घातली होती.
'रांदेव्हू विथ सिमी गरेवाल' या कोणे एके काळच्या सुप्रसिद्ध टॉक शोमधला हा किस्सा पुन्हा वायरल झाला आहे. फक्त बॉलिवूड सिनेमातच नाट्यमय सीन्स असतात, असं नाही. तर रिअल लाईफमध्येही मुकेश अंबानी यांनी नीता यांना 'ड्रामॅटिक' पद्धतीने प्रपोज केलं होतं.
VIDEO | भात, भात, भात...इशा अंबानीच्या लग्नात अमिताभ, आमीर वाढपी
'रांदेव्हू विथ सिमी गरेवाल'च्या सूत्रसंचालिका सिमी गरेवाल यांनी अंबानी दाम्पत्याला बोलतं केलं होतं. मुकेश आणि नीता यांनी आपण कशाप्रकारे प्रेमात पडलो, याच्या आठवणी सांगितल्या होत्या. नीता यांना लग्नाची मागणी कशी घातली? हा प्रश्नी सिमी गरेवाल यांनी विचारताच मुकेश अंबानी यांनी रंगवून किस्सा सांगितला.
'नीता खरंच माझ्या आयुष्यातली पहिली मुलगी होती. माझ्या मनाची तयारी झाली होती, की हीच आपल्या आयुष्याची जोडीदार. आम्ही एकदा पेडर रोडवर ड्राईव्ह करत होतो. अचानक मी नीताला म्हणालो, तू माझ्याशी लग्न करशील का? आत्ताच्या आता गाडीतच हो किंवा नाही, ते सांग' असं मुकेश अंबानी म्हणाले.
इशा अंबानीच्या लग्नात अमिताभ बच्चन, आमिर खान वाढपी | एबीपी माझा | मुंबई
भर ट्राफिकमध्येच हा प्रकार घडल्यामुळे आमच्या आजूबाजूच्या गाड्यांमधील लोकांनी हॉर्न वाजवायला, आरडाओरड करायला सुरुवात केली होती. मुकेश मात्र उत्तर आल्याशिवाय गाडी सुरु न करण्यावर ठाम होते, असं नीता अंबानींनी सांगितलं.
61 वर्षीय मुकेश अंबानी 1984 साली नीता अंबानींसोबत विवाहबंधनात अडकले होते. मुकेश यांचे पिताश्री अर्थात प्रख्यात उद्योजक धीरुभाई अंबानी यांच्या माध्यमातून दोघांची भेट झाली होती. मुकेश-नीता यांना आकाश-इशा आणि अनंत अशी तीन अपत्यं आहेत. नुकतीच आकाश, इशा या दोघांचीही अत्यंत आलिशान पद्धतीने लग्नं झाली आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
राजकारण
भारत
राजकारण
Advertisement