शिक्षा सुनावणीदरम्यान अबू सालेम कोर्टात काय करत होता?
ताहीर मर्चंट आणि फिरोज खान या दोघांना टाडा कोर्टाचे न्यायाधीश जी.ए.सानप यांनी फाशीची शिक्षा सुनावली. तर अबू सालेम आणि करिमुल्लाह खान या दोघांना जन्मठेप देण्यात आली. आणि रियाज सिद्दीकी या पाचव्या दोषीला 10 वर्षाची कैद सुनावण्यात आली आहे.
मुंबई साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी टाडा कोर्टाचा निकाल ताहीर मर्चंट आणि फिरोज खान या दोघांना टाडा कोर्टाचे न्यायाधीश जी.ए.सानप यांनी फाशीची शिक्षा सुनावली. तर अबू सालेम आणि करिमुल्लाह खान या दोघांना जन्मठेप देण्यात आली. आणि रियाज सिद्दीकी या पाचव्या दोषीला 10 वर्षाची कैद सुनावण्यात आली आहे. तब्बल 25 वर्षांनंतर मुंबईतल्या 93 बॉम्बस्फोटांचा हा निर्णय आला. 12 मार्च 1993 ला मुंबईत 12 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. ज्यात 257 लोकांचा मृत्यू तर 700 हून अधिक जणांना गंभीर इजा झाल्या होत्या. या बॉम्बस्फोटांचे मास्टरमाईंड दाऊद इब्राहीम आणि टायगर मेमनसह 27 आरोपी अजूनही फरार आहेत.अबू सालेमला टाडा कोर्टात आणलं गेलं. तिथे आणल्यावर अबू सालेम सातत्याने त्याच्या वकिलांशी चर्चा करत होता. वकिलांच्या माहितीनुसार, सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीबाबत अबू सालेम वकिलांसोबत बोलत होता. अबू सालेमला पहिल्यापासूनच माहित होतं की, जास्तीत जास्त 25 वर्षांची शिक्षा होऊ शकते.
अबू सालेमला कोर्टाने शिक्षा सुनावण्यास सुरुवात झाली, तेव्हा अबू सालेम गपचूप बसला होता. त्याचं कोर्टाकडे लक्ष नव्हतं. आधीच्या दोषींना शिक्षा सुनावली जात होती, त्यावेळी तो ऐकत होता. मात्र ज्यावेळी अबू सालेमची वेळ आली. त्यावेळी तो गप्प बसला होता आणि कोर्टाचे कागदपत्र वाचत होता. मात्र, ज्यावेळी त्याला समजलं की, आपल्याला शिक्षा सुनावली जातेय, त्यावेळी तो समोर आला आणि उभा राहिला.
शिक्षा अनेक प्रकरणात होती. त्यामुळे अबू सालेम केवळ बघत होता. तिथे मुंबई स्फोटातीलच दोषी फिरोज खान होता, जो सर्वांची शिक्षा लिहून घेत होता. (फिरोज खानला फाशीची शिक्षा झालीय.) कोर्ट काय काय शिक्षा सुनावत होतं, ते सारं फिरोज खान लिहून घेत होता.
सर्व आरोपी त्याला विचारत होते की, त्यांना काय काय शिक्षा सुनावली आहे. त्यावेळी अबू सालेमलाही कळलं की, 25 वर्षांची शिक्षा मिळालीय. त्यानंतर अबू सालेम पुन्हा कोर्टात येऊन बसला. याच प्रकरणात आरोपी असलेल्या रियाज सिद्दीकीसोबत तो बोलत होता आणि त्यावेळी अबू सालेम हसत होता.