एक्स्प्लोर
चंद्रकांत पाटलांनी मराठा पीजी मेडिकल आंदोलकाच्या कानात काय सांगितलं?
पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहिलेल्या मराठा विद्यार्थ्यांसाठी अध्यादेश जारी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
मुंबई : कॅबिनेट बैठकीनंतर मंत्री चंद्रकांत दादा पाटील आंदोलनकर्ते आबासाहेब पाटील यांच्या कानात काहीतरी सांगतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? विद्यार्थी सोबत असताना वेगळी चर्चा कशाला? असे सवाल उपस्थित होत आहेत. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशावर चर्चा झाल्यानंतर मराठा विद्यार्थ्यांसाठी अध्यादेश जारी करण्याचा निर्णय झाल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.
मराठा आरक्षणातील एका अटीमुळे पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहिलेल्या मराठा विद्यार्थ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला. या विद्यार्थ्यांसाठी सरकारने अध्यादेश जारी केला. मराठा आरक्षणासाठी अध्यादेश जारी करण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी मिळाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक झाली. त्यात पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशावर चर्चा झाली आणि मराठा विद्यार्थ्यांसाठी अध्यादेश जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Maratha Revervation | पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षण अध्यादेश जारी
अध्यादेश राज्यपालांकडे सहीसाठी जाईल. ज्यांचे प्रवेश झाले आहेत, त्यांचा विषय या अध्यादेशामुळे संपला आहे. त्यानंतर तिसरी फेरीही सुरु होईल. 25 तारखेच्या प्रवेशाबाबतची मर्यादा 31 मेपर्यंत वाढवून द्यावी, अशी विनंती सुप्रीम कोर्टाला करणार असल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.
VIDEO | मराठा विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय प्रवेशासाठी अध्यादेश, चंद्रकांत पाटलांची माहिती | एबीपी माझा 213 वाढीव जागेची मागणी आपण करणार आहोत. 21 तारखेला याबाबत बैठक आहे. इतर राज्यांचीही मागणी आहे. तेव्हा वाढीव सीटबाबतही निर्णय होईल. वाढीव सीटला आरक्षण लागू करण्यासाठी कोर्टात जाऊ, असं पाटील म्हणाले. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही, तर त्यांनी खाजगी कॉलेजमध्ये जावं, मॅनेजमेंट कोटा बघावा, सरकारला सहकार्य करावं, अशी विनंतीही चंद्रकांत पाटलांनी केली. सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दणका, पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा आरक्षणानुसार प्रवेश नाही दरम्यान, आमच्यावर संकट नसून लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम आम्ही करत आहोत. मराठा वैद्यकीय विद्यार्थ्यांचं नुकसान करणार नाही, हा दिलेला शब्द पूर्ण केल्याचं मंत्री गिरीश महाजन म्हणाले. ज्यांना अन्याय होत असल्याचं वाटतं, त्यांना इतर ठिकाणी प्रवेश घ्यायचा असेल तर शिष्यवृत्ती देऊ, असं आश्वासनही महाजनांनी दिलं. मंत्रिमंडळाचा विस्तार होणार? मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काही कल्पना नाही. मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतात. गिरीश बापट यांच्यासारख्या काही जणांच्या जागा रिकाम्या होणार आहेत, तेव्हा बघूया, असं मोघम उत्तर गिरीश महाजनांनी दिलं. शिवसेनेला काय द्यायचं आणि काय नाही हा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असंही महाजन म्हणाले. संबंधित बातम्या Maratha Resarvation : अध्यादेश निघाला तरी मराठा विद्यार्थ्यांचे मेडिकल पीजी प्रवेश अडचणीत येणार यावर्षीच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांना मराठा आरक्षण लागू नाही, नागपूर खंडपीठाचा निर्णयExclusive:- कॅबिनेट बैठकीनंतर मंत्री चंद्रकांत दादा पाटलांनी आंदोलनकर्ते आबासाहेब पाटलांच्या कानात काय सांगितलं? काय झाली नेमकी चर्चा? विद्यार्थी सोबत असताना वेगळी चर्चा कशाला? @abpmajhatv pic.twitter.com/o9XODKqdKr
— Vaibhav Suresh Parab (@vaibhavparab21) May 17, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement