एक्स्प्लोर

मुलगा जे करु शकतो ते करतोय, बापाला जे द्यायचंय ते देईल : चंद्रकांत पाटील

तसंच धनगर आरक्षणाबाबत आम्ही दिल्लीत आदिवासी आयोगाकडे जाऊ, फॉलो अप घेऊ, असं आश्वासनही चंद्रकांत पाटील यांनी दिलं.

मुंबई : विधीमंडळात आज आरक्षणाच्या मुद्द्यावरुन रणकंदन सुरु आहे. "धनगर आरक्षणाबाबतचा टीस अर्थात 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस'चा अहवाल आला आहे. याबाबत पत्र लिहून केंद्र सरकारला कळवलं आहे. मुलगा जे करु शकतो ते करत आहे आणि बापाने जे द्यायचं आहे ते बाप देईल," असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. धनगर आरक्षणासंदर्भात त्यांनी हे विधान केलं. चंद्रकांत पाटील म्हणाले की, "राज्यात जे आरक्षण द्यायचं आहे, त्यासाठी केंद्राची परवानगी हवी आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री बुद्धीमान आहेत. ते विचार करुन बोलले आहेत. आमच्या हातात जे आहे ते आम्ही केलं. जे केंद्राच्या अखत्यारीत आहे त्याबाबत पाठपुरवठा सुरु आहे. मुलगा जे करु शकतो ते करत आहे, जे बापाने द्यायचे ते बाप देणार." तसंच धनगर आरक्षणाबाबत आम्ही दिल्लीत आदिवासी आयोगाकडे जाऊ, फॉलो अप घेऊ, असं आश्वासनही चंद्रकांत पाटील यांनी दिलं. आरक्षणासाठी कटिबद्ध धनगर आरक्षणाचा अहवाल घेऊन आम्ही केंद्रीय ओबीसी आयोगाकडे जाणार आहोत. आरक्षणाची मागणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. मुस्लिम समाजाच्या अनेक जातींना आरक्षण लागू आहे, मात्र ते अधिक बळकट करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. धनगरांना आरक्षण द्या : देशमुख धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी TISS चा अहवाल सरकारकडे सादर झाला आहे. मात्र या अहवालाबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी. त्याच्या शिफारशी तात्काळ केंद्राकडे पाठवा आणि धनगरांना आरक्षण द्या, अशी मागणी गणपतराव देशमुख यांनी सभागृहात केली. सरकारच्या मनात पाप : धनंजय मुंडे "हे सरकार फसवणूक करत आहेत. 'टिस'ला धनगर आरक्षणाबाबत काम दिलं तेव्हाच आम्ही आक्षेप घेतला होता. 'टिस'ला घटनात्मक मान्यता नव्हती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आरक्षण मान्य नाही. हे त्यांच्या विचारांचं सरकार असून त्यांच्या मनात पाप आहे. त्यांना आरक्षण द्यायचं नाही," असं धनंजय मुंडे म्हणाले. धनगर आरक्षणावर मुख्यमंत्र्यांचं घुमजाव : विखे पाटील धनगर आरक्षणासंदर्भात तर मुख्यमंत्र्यांनी अक्षरश: घुमजाव केलं आहे. निवडणुकीपूर्वी स्वतः मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत आरक्षण देण्याची घोषणा केली होती. मात्र आता धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याचा अधिकार राज्याला नव्हे तर केंद्राला असल्याची कातडीबचाव भूमिका त्यांनी घेतली आहे. यासंदर्भात राज्य सरकारला अधिकार नाहीत तर धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन का देण्यात आले? 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस'कडून सर्वेक्षण का करुन घेण्यात आलं? याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादांच्या अपघाताबाबत तटकरेंची चौकशी करावी, रामदास कदमांना समर्थन देत शिवसेना आमदाराची मागणी  
अजितदादांच्या अपघाताबाबत तटकरेंची चौकशी करावी, रामदास कदमांना समर्थन देत शिवसेना आमदाराची मागणी  
दिवाळीनंतर मुंबईची हवा 'खराब', पण बांधकाम साईटचे बोर्ड सांगतायत 'चांगली', आवाज फाऊंडेशनचा धक्कादायक अहवाल
दिवाळीनंतर मुंबईची हवा 'खराब', पण बांधकाम साईटचे बोर्ड सांगतायत 'चांगली', आवाज फाऊंडेशनचा धक्कादायक अहवाल
अजित पवार अपघात प्रकरण! रामदास कदमांनी तटकरेंवर केलेले आरोप ऐकले नाहीत, पण... दिवाळीनंतर शेवटचं प्रेझेन्टेशन घेणार, रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
अजित पवार अपघात प्रकरण! रामदास कदमांनी तटकरेंवर केलेले आरोप ऐकले नाहीत, पण... दिवाळीनंतर शेवटचं प्रेझेन्टेशन घेणार, रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Mumbai Rocket Ban : दिवाळीत आगीच्या वाढत्या घटना, मुंबईत आकाशात उडणाऱ्या फटाक्यांवर आणि रॉकेटवर पूर्ण बंदी
दिवाळीत आगीच्या वाढत्या घटना, मुंबईत आकाशात उडणाऱ्या फटाक्यांवर आणि रॉकेटवर पूर्ण बंदी

व्हिडीओ

Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UP Car Accident: दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
Ajit Pawar family Visit Memorial: दिवाळी पाडव्याला सुनेत्रा वहिनी मुलं-सुनांसोबत अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या; कायनात दारा, ऋतुजा पवारांनी वाहिली श्रद्धांजली, दादांच्या बहिणीला अश्रू अनावर
सुनेत्रा वहिनी मुलं-सुनांसोबत अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या; कायनात दारा, ऋतुजा पवारांनी वाहिली श्रद्धांजली, दादांच्या बहिणीला अश्रू अनावर
Gokul Chairman Election Mahayuti: गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
Gokul Chairman Election 2026: गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
Gokul Chairman Election 2026 Mahayuti: गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीने मोहरा निवडला, राजेश पाटलांनी उमेदवारी अर्ज भरला, निकाल किती वाजता लागणार?
गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीने मोहरा निवडला, राजेश पाटलांनी उमेदवारी अर्ज भरला, निकाल किती वाजता लागणार?
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
Rajesh Patil and Ajit Pawar: गड आला पण सिंह गेला, जेव्हा राजेश पाटलांच्या पराभवाने अजितदादांनी फेटा बांधायला नकार दिला
गड आला पण सिंह गेला, जेव्हा राजेश पाटलांच्या पराभवाने अजितदादांनी फेटा बांधायला नकार दिला
Gokul Chairman Election 2026 Rajesh Patil: जोपर्यंत अजितदादा मुख्यमंत्री होणार नाही, तोपर्यंत फेटा बांधणार नाही, भीष्मप्रतिज्ञा करणारे राजेश पाटील गोकुळच्या अध्यक्षपदाचे उमेदवार, धगधगती राजकीय कारकीर्द!
अजितदादा मुख्यमंत्री होणार नाही, तोपर्यंत फेटा बांधणार नाही, भीष्मप्रतिज्ञा करणारे राजेश पाटील गोकुळच्या अध्यक्षपदाचे उमेदवार, धगधगती राजकीय कारकीर्द!
Embed widget