एक्स्प्लोर
लोकलमधून लटकून तरुणीची स्टंटबाजी, थोडक्यात जीव वाचला
सोबत असणाऱ्या युवकाने वेळीच पकडल्यामुळे स्टंटबाजी करणाऱ्या युवतीचे प्राण वाचले

मुंबई : लोकल ट्रेनच्या दरवाजात लटकून स्टंटबाजी करणारे युवक अनेक वेळा दिसतात. मात्र आता लोकलच्या दारात स्टंटबाजी करणाऱ्या एका युवतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे तरुणीचा जीव थोडक्यात बचावला. संबंधित तरुणी लोकलच्या दरवाजात उभी होती. एक हात सोडून ती पुढे वाकली, मात्र त्याच वेळी समोरुन आलेल्या लोकलमुळे तिचा हात निसटला. सुदैवाने तिच्यासोबत असणाऱ्या युवकाने तिला वेळीच पकडलं. तर आणखी एक सहप्रवासी मदतीला धावला. दोघांनी या तरुणीला वर खेचल्यामुळे तिचा जीव वाचला. एका प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये ही घटना चित्रीत केली. हा व्हिडिओ नेमका कुठला आणि कधीचा आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही. लोकल प्रवासात स्टंटबाजी करु नये, असं आवाहन या निमित्ताने पुन्हा करण्यात येत आहे. पाहा व्हिडिओ
Before You Go
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















