एक्स्प्लोर
नवी मुंबई एपीएमसीत भाज्यांचे दर कोसळले
नवी मुंबई : नवी मुंबईतील एपीएमसीमध्ये विक्रमी आवक झाल्याने भाज्यांचे दर गडगडले आहेत. टोमॅटो, कोबीला एका किलोमागे फक्त चार रुपयांचा भाव मिळत आहे.
भाज्यांच्या दरात अचानक झालेल्या या घसरणीने शेतकरी चिंतेत आहेत.
एपीएमसीच्या भाजीपाला मार्केटमध्ये गेल्या दोन दिवसात विक्रमी आवक झाली आहे. 750 ते 850 गाड्या भरुन भाजीपाला विक्रीसाठी येत आहे. राज्यासोबतच परराज्यातील भाजीपालाही इथे मोठ्या प्रमाणावर येत असल्याने त्याचाही परिणाम दरांवर झाल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान किरकोळ बाजारातील भाज्यांच्या दरात सध्या तरी बदल झालेले दिसत नाहीत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement