एक्स्प्लोर
प्लास्टिकविरोधी कारवाईचा दंड देण्यासाठी पाच हजारांचे चिल्लर
नालासोपारा पूर्वेकडील अमित मेहता यांच्या दुकानावर काल कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी प्लास्टिक आढळल्याने पाच हजाराच्या दंडाची पावती फाडण्यात आली.
वसई : वसई विरार शहर महानगरपालिकेने प्लास्टिकविरोधात आक्रमक मोहीम उघडली आहे. या प्रकरणी एका व्यापाऱ्याला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला, मात्र या दुकानदाराने पालिका अधिकाऱ्यांना त्रास देण्यासाठी चक्क ही रक्कम सुट्ट्या पैशांच्या स्वरुपात भरली.
ज्या दुकानात किंवा कारखान्यात प्लास्टिक आढळेल, त्याच्या मालकाकडून दंड आकारुन पालिकेला पैसे वसूल करावे लागतात. नालासोपारा पूर्वेकडील अमित मेहता यांच्या दुकानावर काल कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी प्लास्टिक आढळल्याने पाच हजाराच्या दंडाची पावती फाडण्यात आली.
पालिका अधिकाऱ्यांना त्रास देण्यासाठी अमित मेहतांनी चक्क ही रक्कम सुट्ट्या पैशांच्या स्वरुपात भरली. कहर म्हणजे ही चिल्लरही त्यांनी प्लास्टिकच्या पिशवीतच दिली. पाच हजारांची सुट्टी नाणी मोजण्यासाठी दुकानात अधिकाऱ्यांना एक तास, तर महापालिका कार्यालयात सहाय्यक आयुक्त सुखदेव दरवेशी यांना तब्बल 40 मिनिटे लागली.
वसई विरार महानगरपालिकेने आतापर्यंत चार हजाराच्या वर दुकाने तपासली आहेत. त्यात 135 दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर प्लास्टिक बनवणाऱ्या 15 कंपन्यांवर कारवाई केली आहे. आतापर्यंत पाच लाखांच्या वर दंड वसूल केला आहे. तर 22 हजार 874 किलो प्लास्टिकही जप्त केलं आहे.
आता महापालिकेच्या प्लास्टिकवरील कारवाईविरोधात त्रास देण्यासाठी प्रत्येक दुकानदाराने ही शक्कल लढवली, तर पालिका अधिकाऱ्यांना डोकेदुखीचा सामना करावा लागेल हे नक्की.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement