एक्स्प्लोर
मुल होत नाही म्हणून उपचार घेण्यासाठी गेलेल्या पुरुषाच्या पोटातून गर्भाशय काढलं
अशा परिस्थितीमध्ये अंडाशयाला कर्करोग होण्याची 20 टक्के शक्यता असते. त्यामुळे या व्यक्तीची सोनोग्राफी, एमआरआय केल्यानंतर काही दिवसांपूर्वी त्याचं गर्भाशय काढून टाकण्यात आलं.

मुंबई : मुल होत नाही म्हणून उपचार घेण्यासाठी गेलेल्या पुरुषाच्या पोटातून गर्भाशय काढलं आहे. मुंबईतील एका २९ वर्षीय व्यक्तीवर जे.जे हॉस्पिटलमध्ये ही दुर्मिळ शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
या व्यक्तीच्या पोटातून गर्भाशय काढण्यात आलं आहे. जे.जे. हॉस्पिटलच्या युरोलॉजी विभागाचे प्रमुख प्रो. डॉ. व्यकंट गिते आणि त्यांच्या संपूर्ण टीमने ही यशस्वीपणे शस्त्रक्रिया केली.
ही व्यक्ती गेल्या एक महिन्यापासून वंधत्व निवारण्यासाठीचे उपचार जे.जे हॉस्पिटलमध्ये घेत होती. त्यांची सोनोग्राफी केल्यानंतर त्यांच्या पोटात महिलेसारखं गर्भाशय आढळून आलं होतं.
अशा परिस्थितीमध्ये अंडाशयाला कर्करोग होण्याची 20 टक्के शक्यता असते. त्यामुळे या व्यक्तीची सोनोग्राफी, एमआरआय केल्यानंतर काही दिवसांपूर्वी त्याचं गर्भाशय काढून टाकण्यात आलं.
या शस्त्रक्रियेदरम्यान त्याचे अंडाशय हे अंडकोषात सरकवण्यात आले. या व्यक्तीचे अंडाशय हो पोटातच असून त्यांची अंडकोषापर्यंत वाढ झालेली नव्हती. त्या व्यक्तीच्या लिंगाची वाढ व्यवस्थित होती. पण, वीर्य तपासणीत शुक्राणू आढळले नाहीत.
त्यानंतर या व्यक्तीला ‘ अनडिसेंडेड टेस्टीज ‘ चं निदान केलं. शस्त्रक्रियेदरम्यान या व्यक्तीच्या अंडाशयासोबत महिलांमध्ये आढळणारे गर्भाशयासारखे अवयव दिसून आले होते.
त्यामुळे , या व्यक्तीची हार्मोनल, सिटीस्कॅन, एमआरआय आणि बायोप्सी तपासणी करण्यात आली. या चाचण्यांमध्ये सहा सेमीएवढे गर्भाशय इतर गर्भाशयाशी निगडीत असलेल्या अवयवासोबत होते. पुरुषांमध्ये गर्भाशय आढळणाऱ्या या निदानाला 'प्रायमरी मुल्येरीयन डक्ट सिंड्रोम-फिमेल' असं म्हणतात.
सर्व तपासणीनंतर, रुग्णाचे अंडाशय हे अंडकोषात सरकण्यात आले. या शस्त्रक्रिया खूपच अवघड मानल्या जातात. जगात अशा फक्त 200 केसेस आहेत. अशा रुग्णांना अंडाशयाचा कर्करोग होण्याची ही शक्यता असते.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
लातूर
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement





















