एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Mumbai Omicron cases : मुंबईतील कोरोनाबाधितांपैकी 80 टक्के रूग्ण ओमायक्रॉन बाधित, BMC आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांची माहिती

मुंबईत (Mumbai ) कोरोना (Corona) रूग्ण वाढत आहेत. सध्या मुंबईतील कोरोना रूग्णांपैकी 80 टक्के रूग्ण ओमायक्रॉनबाधित (Omicron) असल्याचे BMC चे आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल (Dr. Iqbal Singh Chahal) यांनी सांगितले

मुंबई : मुंबईमधील  (Mumbai ) कोरोनाबाधितांच्या (Corona) स्पाईकमध्ये ओमायक्रॉनचाच (Omicron) हात असल्याचं मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल (Dr. Iqbal Singh Chahal) यांनी स्पष्ट केलं आहे. एनडीटीव्ही या इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलत असताना डॉ. चहल यांनी याबात माहिती दिली आहे.

सध्या मुंबईत आढळत असलेल्या एकूण कोरोनाबाधितांपैकी तब्बल 80 टक्के रूग्ण ओमायक्रॉन बाधित असल्याची माहिती राज्याच्या कोरोना टास्क फोर्सच्या तज्ञांनी दिल्याची माहिती डॉ. चहल यांनी या विशेष मुलाखतीत दिली आहे. असं असलं तरी सध्या तरी ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे मुंबईकरांना घाबरण्याची आवश्यकता नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबई महापालिकेने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कॉरंटाईन तसंच होम कॉरंटाईन करण्यासाठी विषेश प्रोग्राम राबवल्याची माहितीही डॉ. चहल यांनी यावेळी दिली. 

मुंबईच्या कोविड पॉजिटिव्हिटी रेटमध्ये 21 डिसेंबरपासून वाढ होत आहे. त्याला आज 14 दिवस झाले आहेत. 21 डिसेंबरपूर्वी मुंबईचा पॉजिटिव्हिटी दर एक टक्क्यांपेक्षा कमी होता. त्यानंतर आज चौदाव्या दिवशी मुंबईचा कोरोना वृद्धी दर हा 17 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण 7 डिसेंबर रोजी सापडला होता. त्यापूर्वीच केंद्राच्या ओमायक्रॉन बाबत गाईडलाईन्स मिळाल्याने मुंबई महापालिकेने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांबाबत खास होम क्वारंटाईन प्रणाली सुरु केली. 3 डिसेंबर म्हणजे आजपासून बरोबर एक महिन्यापूर्वीच मुंबई महापालिकेने ओमायक्रॉनबाबत ही क्वारंटाईन प्रणाली राबवायला सुरुवात केली आहे, अशी माहिती डॉ. इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशात गेल्या 24 तासांत 33 हजार 750 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर महाराष्ट्रात 11 हजार 877  कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात रविवारी आढळलेल्या रूग्णांमधील 7 हजार 792 रूग्ण फक्त मुंबईतील आहेत. आजही मुंबईत एवढेच रूग्ण आढळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.  
 
ओमायक्रॉनच्या रूग्णांमध्ये वाढ
दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनचा रूग्ण आढळल्यानंतर जगभरातील देशांनी सतर्कता बाळगली. परंतु, जवळपास शंभर पेक्षा जास्त देशात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढला आहे. भारतातही आपर्यंत 1700 ओमायक्रॉनचे रूग्ण आढळले आहेत. महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकेडवारीनुसार, राज्यात काल 50 नव्या ओमायक्रॉनबाधित रुग्णाची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या आता 510 वर पोहोचली आहे. त्यातच आता मुंबईत आढळणाऱ्या कोरोना रूग्णांमधील 80 टक्के रूग्ण हे ओमयक्रॉनचे असल्याची माहिती डॉ. चहल यांनी दिली आहे.   

दिल्लीतही ओमायक्रॉनच्या रूग्णांमध्ये वाढ
मुंबईप्रमाणेच राजधानी दिल्लीतही कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटने धुमाकूळ घातला आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंदर जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30-31 डिसेंबर दरम्यान सापडलेल्या कोरोनाबाधितांच्या जिनोम सिक्वेन्स अहवालानुसार, 84 टक्के कोरोनाबाधित ओमायक्रॉनचे असल्याचा दावा जैन यांनी केलाय.

महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  8 AM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  27 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRatnagiti Weather : रत्नागिरीत धुकेच धुके... सोबत कमालीचा गारठाDhananjay Chandrachud : संजय राऊतांच्या आरोपांवर चंद्रचूड यांचं उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Bollywood Actor Life: जन्म होताच आईला गमावलं, ड्रग्सच्या नशेनं बालपण हिरावलं, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
जन्म होताच आईला गमावलं, ड्रग्सच्या नशेनं बालपण हिरावलं, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
Maharashtra CM: मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा?
मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, राज्यात देवेंद्रपर्वाचा मार्ग मोकळा?
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Embed widget