Mumbai Police : ओव्हरलोडींग ट्रक मुंबईच्या रस्त्यावर; फोटो शेअर करत पोलिसांना कारवाई करण्याचं आवाहन
Mumbai Traffic Rule : मुंबईत मालवाहू ट्रकमध्ये ट्रक चालकाने एक नाही दोन नाही तर तब्बल तिप्पट माल वाहून नेल्याची घटना समोर आली आहे.
Mumbai Traffic Rule : मुंबईसारख्या ठिकाणी रात्र असो वा दिवस वाहतूककोंडी ही असतेच. परंतु, याच वाहतूकीतून तिप्पट मालवाहतूक केल्याचा फोटो सध्या व्हायरल होतोय. या मालवाहू ट्रकमध्ये ट्रक चालकाने एक नाही दोन नाही तर तब्बल तिप्पट माल वाहून नेल्याची घटना समोर आली आहे. काल रात्री 11:30 च्या सुमारास पश्चिम द्रुतगती महामार्गावरील (Western Express Highway) कांदिवली पूर्व येथे हा ट्रक निदर्शनास आला. हा फोटो मुंबई मॅटर्स यांनी मुंबई ट्रॅफिक पोलिसांना शेअर केला आहे.
Late Post@MTPHereToHelp @sanjayp_1
— मुंबई Matters™✳️ (@mumbaimatterz) May 31, 2022
Yesterday night approx 11.30pm at Kandivali East on Western Express Highway..
Truck Number MH48AY4408
Is it carrying the #Gaganyaan rocket or #SpaceX pic.twitter.com/H5aiTz3btD
खरंतर मुंबईसारख्या ठिकाणी वाहतुकीचे नियम इतके कडक असताना असे प्रकार घडतात. मुंबईच्या बऱ्याच रस्त्यावर रात्रीच्या वेळी हे असे अवजड वाहनं रस्त्यावर येतात आणि त्याच्यामध्ये आवश्यकतेपेक्षा दुप्पट तिप्पट माल भरलेला असतो. यामुळे वाहन चालकाच्या जीवाला तर धोका असतोच. पण त्याचबरोबर मार्गावर आजूबाजूला ये-जा करणाऱ्या वाहनचालकांच्याही जीवाला धोका असतो.
या करता घडलेला प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन योग्य कारवाई करणे गरजेचे आहे. रात्रीच्या वेळी रहदारी कमी असल्यामुळे या गोष्टी चालून जातात पण तरीही हे नियमबाह्य आहे आणि नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Crime News : मुलींसोबत मैत्री करण्यासाठी करायचा बाईक चोरी; हार विक्रेत्याला पोलिसांच्या बेड्या
- नांदेडमधील बियाणी हत्याप्रकरणाचं गूढ उलगडलं, सात जण पोलिसांच्या ताब्यात
- पोटच्या पोरांनीच पित्याला घातला गंडा; ATM चा वापर करत तब्बल 2 लाखांची रोकड लंपास
- Crime News : Any Desk ॲपच्या मदतीने बँक खाते रिकामी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोन आरोपींना अटक