एक्स्प्लोर
डोंबिवलीत भर दिवसा बिल्डर समजून अंगरक्षकाची हत्या

डोंबिवली : डोंबिलीच्या शीळफाटा रोडवरील काटई नाका परिसर दिवसा ढवळ्या गोळीबाराने हादरला. बिल्डर आणि शिवसेना समर्थक अमित पाटील यांचा अंगरक्षक रवी शर्मा उर्फ विकीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांना अमितवर निशाणा साधायचा होता. मात्र हल्लेखोरांनी अमित समजून रवी शर्मावरच गोळ्या झाडल्या. डोंबिवलीचे मनसेचे माजी आमदार रमेश पाटील यांचा भाऊ विनोद पाटील यांनी हा गोळीबार घडवून आणल्याचा आरोप अमित पाटीलच्या वडिलांनी केलाय. या हत्येप्रकरणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोरांना गजाआड करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. कारण हल्लेखोरांच्या अटकेनंतरच हत्येमागे नेमका कुणाचा हात होता, हे स्पष्ट होणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम





















