एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ठाण्यातल्या अनधिकृत टेलिफोन एक्सेंजचा पर्दाफाश, चार आरोपी ताब्यात
ठाणे : सर्व सरकारी यंत्रणांना अंधारात ठेवून ठाण्यात चोरीछुपे अनधिकृत टेलिफोन एक्सेंज सुरू करण्यात आलं होतं. ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेनं या अनधिकृत टेलिफोन एक्सेंजचा पर्दाफाश केला असून 4 जणांना अटक केली आहे.
कुणालाही कानोकान खबर न लागू देता आरोपींनी इंटरनॅशनल कॉल करण्याची यंत्रणा उभी केली होती. त्यामुळं या टेलिफोन एक्सेंजचा वापर देशविघात कृत्यासाठी तर करण्यात येत नव्हता ना, याचा पोलीस तपास करत आहेत. या अनधिकृत टेलिफोन एक्सेंजमुळं सरकारचा 30 कोटींचा महसूल बुडाल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे.
विशेष म्हणजे, सुरक्षा यंत्रणेला ट्रेस करता येऊ नये, यासाठी आंतरराष्ट्रीय कॉल व्हीओआयपीद्वारे कॉल प्राप्त करत होते. त्यानंतर बनावट एक्सेंजद्वारे तो कॉल डोमेस्टिक कॉलमध्ये ट्रान्सफर करुन इच्छित भारतीयच्या लॅण्डलाइन किंवा मोबाईलशी जोडला जात होता.
या प्रकरणी ठाणे पोलिसांनी चार आरोपीना अटक केली असून पाचवा आरोपी ताब्यात घेतला आहे . पोलिसांनी एक्सेंजमधून 17 लाख 54 हजाराचा मुद्देमालही जप्त केला आहे.
या बोगस एक्सेंजचा उपयोग हवाला आणि अन्य गैरकृत्यासाठी वापरण्यात येत असावा संशय पोलिसांना आहे. त्या दिशेने पोलीस पथक तपास करीत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्रीडा
करमणूक
निवडणूक
Advertisement