एक्स्प्लोर
उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीला झटका, कलानी-भाजप-रिपाइं युती
कल्याण : उल्हासनगर महापालिकेत राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. ओमी कलानींचा गट, रिपाइं आणि भाजपने युती जाहीर केली आहे. उल्हानगरच्या गोल मैदानात झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ही घोषणा करण्यात आली.
ओमी कलानी हे कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसून तलवार घेऊन सभास्थळी आल्यानं सर्वांनाच धक्का बसला. ओमी कलानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार ज्योती कलानी यांचे पुत्र आहेत. दुसरीकडे ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचाही राजीनामा दिल्यानं राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.
21 फेब्रुवारीला उल्हासनगर महापालिकेसाठी मतदान होणार असून 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. शिवसेना स्वबळावर लढणार असून भाजपला कलानी आणि रिपाइंची ताकद मिळणार आहे. या युतीचा राष्ट्रवादीला बसण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे ही लढत पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या :
पवारसाहेब, खा. महाडिकांच्या भूमिकेबाबत गप्प का?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement