एक्स्प्लोर
चायनीज विक्रेत्याने ग्राहकावर उकळतं तेल फेकलं!
उल्हासनगरच्या व्हीनस चौकात मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली आहे.
उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये चायनीज विक्रेत्यानं रागाच्या भरात ग्राहकावर उकळत तेल फेकल्याची घटना समोर आली आहे. पदार्थ नीट न केल्याचा जाब विचारल्याने विक्रेत्याला संताप अनावर झाला.
उल्हासनगरमध्ये व्हिनस चौकातील मनोज कोळीवाडा या चायनीजच्या दुकानात मंगळवारी रात्री 12 वाजता ही घटना घडली. चायनीज पदार्थ नीट न केल्याचा जाब ग्राहकानं विचारल्यानं दुकानदारानं त्यांना मारहाण केली.
मारहाणीनंतर ग्राहकाचा मोठा भाऊ दीपक म्हस्के चायनीज स्टॉलवर आला आणि त्याने भावाला मारहाण केल्याचा जाब विचारला. त्यावेळी चायनीज विक्रेत्यानं त्याच्या अंगावर चक्क उकळतं केलं फेकलं.
हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून जखमी दीपक म्हस्केवर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलिसांत अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement