Uddhav Thackeray: ऑपरेशन टायगरची चर्चा, डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये; आमदार-खासदारांंना मातोश्रीवर बोलावलं, मोठा निर्णय घेण्याची तयारी?
Uddhav Thackeray: पक्षातील माजी आमदार,अनेक पदाधिकारी ठाकरेंची साथ सोडत असताना उद्धव ठाकरे यांनी आमदार खासदारांची बैठक बोलवली आहे.

मुंबई: राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाचे काही, आजी-माजी आमदार, खासदार फुटून शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याचं बोललं जात आहे. ठाकरे गटासह महाविकास आघाडीतील 10 ते 12 माजी आमदार देखील शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. येत्या काळात पक्षप्रवेश पार पडतील असंही वक्तव्य मंत्री उदय सामंतांनी केलं होतं. त्यानंतर काही दिवसामध्येच ठाकरेंचे विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जाणारे राजन साळवी यांनी शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला, त्यानंतर आता पक्षाला आणखी काही धक्के बसू नयेत यासाठी उध्दव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत, त्यांनी आत डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पक्षातील माजी आमदार,अनेक पदाधिकारी ठाकरेंची साथ सोडत असताना उद्धव ठाकरे यांनी आमदार खासदारांची बैठक बोलवली आहे.
खासदारांची 20 तारखेला तर आमदारांची 25 तारखेला बैठक
ठाकरे गटाच्या खासदारांची 20 तारखेला तर आमदारांची 25 तारखेला बैठक बोलावण्यात आली आहे. खासदार, आमदारांना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. पक्षातील माजी आमदार,अनेक पदाधिकारी ठाकरेंची साथ सोडत असताना उद्धव ठाकरे यांनी आमदार खासदारांची बैठक बोलवली आहे, या बैठकीच्या माध्यमातून ठाकरे डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना आदित्य ठाकरे यांनी खासदारांची दिल्लीत बैठक घेतली होती.अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना काही खासदार ठाकरेंची साथ सोडणार अशी चर्चा सुरु होती. ऑपरेशन टायगर होणार अशा चर्चा सुरु असताना ठाकरेंच्या खासदारांची बैठक बोलावली आहे.
खासदारांची बैठक झाल्यानंतर ठाकरे गटातील आमदारांची बैठक 25 फेब्रुवारी रोजी होणार आहे. विधानसभेचे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांची बैठक बोलवण्यात आल्याची चर्चा आहे. आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत विरोधी पक्ष नेत्याचे नाव निश्चितीबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 20 तारखेला खासदार आणि 25 तारखेला आमदारांना बैठकीला उपस्थित राहण्याचे शिवसेना भवन येथून आदेश देण्यात आले असल्याचे सूत्रांची माहिती आहे.
माजी आमदार काही पदाधिकारी पक्ष सोडून जात आहेत. उद्धव ठाकरेंना सोडून ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे ही गळती थांबवण्यासाठी या बैठका बोलवण्यात आलेले आहेत, वीस तारखेला आधी खासदारांसोबत उद्धव ठाकरे बैठक देणार आहेत. त्यानंतर 25 तारखेला ते आमदारांसोबत बैठक घेतील. या बैठकीमध्ये ते त्या-त्या मतदारसंघांमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे हे समजून घेण्यासाठी बैठक बोलवण्यात आली आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसात ऑपरेशन टायगरच्या चर्चा होत्या, या दृष्टिकोनातून या बैठका महत्त्वाचा मानल्या जात आहेत.
























