एक्स्प्लोर
कल्याण-डोंबिवली महापालिकेत नगरसेवकांचे समर्थक भिडले
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या दोन नगरसेवकांच्या समर्थकांमध्ये पालिका आवारातच राडा झाला. या घटनेदरम्यान पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळं मोठा अनर्थ टळला. मात्र या घटनेनंतर महापालिकेच्या आवारात नगरसेवकांच्या कोणत्याही समर्थकास प्रवेश देऊ नये, अशी मागणी जोर धरत आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेची महासभा असल्यानं सर्वपक्षीय नगरसेवक महापालिकेत जमा झाले होते. त्यावेळी नगरसेवक कुणाल पाटील आणि महेश गायकवाड यांचे समर्थक एकमेकांना भिडले. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळला. यावेळी पोलिसांनी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या गाडीची झडती घेतल्यानंतर त्यांच्या गाडीत हॉकी स्टिक सापडल्या. तर दुसरीकडे काँग्रेस नगरसेविका शिल्पा यांचे वडील आणि माजी नगरसेवक सदाशिव शेलार यांच्या गाडीत बंदूक सापडली. पोलिसांनी या दोघांकडचेही साहित्य जप्त केलं आहे. तसेच 9 ते 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून कुणाल पाटील आणि महेश गायकवाड या दोन नगरसेवकांमध्ये सातत्याने वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. या दोन्ही नगरसेवकांच्या समर्थकांमध्ये गेल्या काही दिवसांत झालेला हा तिसरा राडा आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे पालिकेची सुरक्षा मात्र धोक्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर कोणत्याही नगरसेवकांच्या समर्थकांना पालिकेच्या आवारात प्रवेश न देण्याची मागणी जोर धरत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement