एक्स्प्लोर

भिवंडीत आदिवासी समाज बांधवांचा लसीकरणाच्या भीतीनं जंगलात पळ!

लसीकरण करण्यासाठी गावात कोणी येईल या भीतीने गावा बाहेरील जंगलात दिवसभर लपून बसणारे नागरिक सुद्धा आढळून येत आहेत. ठाणे जिल्ह्यापासून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर भिवंडी तालुक्यातील आदिवासी पाड्यावरील हे वास्तव विदारक आहे.

भिवंडी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना लसीकरण हा एकमेव आधार या पासून बचाव करण्यासाठी समोर दिसत आहे. असं असताना शहरात लस उपलब्ध नसल्याने ओरड होत असतानाच शहरातील नागरिक ग्रामीण लसीकरण केंद्रावर गर्दी करत असल्याचा अनुभव येत आहे. तर दुसरीकडे लसीकरण करण्यासाठी गावात कोणी येईल या भीतीने गावा बाहेरील जंगलात दिवसभर लपून बसणारे नागरिक सुद्धा आढळून येत आहेत. ठाणे जिल्ह्यापासून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर भिवंडी तालुक्यातील आदिवासी पाड्यावरील हे वास्तव विदारक आहे.

लसीकरण करण्यासाठीची ऑनलाईन पद्धती ग्रामीण अशिक्षित जनतेला समजत नसल्याने ग्रामीण भागात ऑफलाईन लसीकरण व्हावे अशी मागणी वाढत असतानाच आदिवासी समाज आज ही कपोलकल्पित भीतीने या लसीकरणापासून दूर पळत असल्याची आकडेवारी समोर आले आहे. हे कळताच जिल्हा परिषद आरोग्य समिती सभापती कुंदन पाटील यांनी आदिवासी विकास क्षेत्र कार्यक्षेत्रात येणाऱ्या चिंबी पाडा प्राथमिक आरोग्य केंद्रास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मनीष रेंगे यांसोबत भेट देत तेथील लसीकरणाची माहिती करून घेत या परिसरातील खडकी बुद्रुक,आमराई ,कुंभारपाड , चिंबीपाडा ,बालखडी , पिंपळशेत,म्हसकर पाडा या आदिवासी पाड्यांना भेटी देऊन तेथील बायबापड्यांसह जमिनीवर बैठक मारून त्यांची समजूत काढली. 

काय आहेत आदिवासींच्या मनातील भीती
लस उपलब्ध नसल्याने शहरी भागात नागरिकांची ओरड होत असून ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रावर त्यांची गर्दी ओसंडून वाढत आहे. परंतु आज ही ग्रामीण भागातील  आदिवासी समाज आजही लसीकरणापासून लांब पळत आहे. इतकेच नव्हे तर अनेक पाड्या वस्त्यांवरील आदिवासी समाज बांधव सकाळी लसीकरणासाठी पकडून घेऊन जातील म्हणून जंगलात पळून जातात. ही लस घेतली की आपण मरणार ,आपल्याला इतर आजार जडतील,लस द्यायला घेऊन जातील आणि इतर अवयव काढून घेतली या कपोलकल्पित भीतीने या अशिक्षित समाज बांधवांच्या मनात घर केले आहे .त्यामुळे ग्रामीण आदिवासी भागात आज ही लसीकरण अत्यल्प झाले असून त्यामध्ये आदिवासी समाजाचा टक्का नगण्य आहे.

आपण शहरी भागात राहणारे लसीकरणासाठी धावपळ करीत असताना ग्रामीण भागातील आदिवासी समाज लसीकरणापासून दूर पळत आहे. त्यासाठी शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी, समाजसेवी संस्था सुशिक्षित समाज घटक या सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असून या समाजाला लसीकरण सुरक्षित व आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असल्याचा विश्वास या समाजाला देणे गरजेचे असल्याचे सांगत ग्रामीण भागात लसीकरण ऑनलाईन नाव नोंदणी शक्य नसल्याने ऑफलाईन लसीकरण सुरू केले असल्याची माहिती कुंदन पाटील यांनी दिली आहे .

आम्ही दिवसभर शेतात रानात काबाडकष्ट करत असून कोरोनाने आमच्या पाड्यात अजून शिरकाव केलेला नाही. आम्हाला कोणता आजार नाही. मग आम्ही लस कशाला घ्यायची, असा सवाल उपस्थित करीत ज्यांना गरज आहे त्यांना लस द्या असा प्रतिप्रश्न जनजागृती करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रखमाबाई या महिलेने केला. एकूणच लसीकरण समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्यासाठी या समाजातील लसीबाबत पसरलेले गैरसमज दूर करण्यासाठी शासन प्रशासन यांना अजून बरीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे एवढे नक्की.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dr. Manmohan Singh Passes Away : डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासZero Hour : महिला कुठेच सुरक्षित नाहीत? नराधमांना कायद्याची भीती कधी बसणार?Job Majha | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत प्रशासकीय अधिकारी पदावर भरती ABP MajhaKailash Phad Arrested : बीडमध्ये हवेत फायरिंग करणारा कैलास फड अटकेत, परळी पोलिसांची कारवाई

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
Embed widget