(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Viral: दिल का टेलीफोन गाण्यावर मुंबई पोलिसांचं स्पेशल ट्रॅफिक अभियान; युजर्स म्हणतात, वाह! क्या बात!
Viral Video: मुंबई पोलिसांचं स्पेशल ट्रॅफिक अभियान. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल.
Mumbai Traffic Updates: 'ड्रीम गर्ल 2' (Dream Girl 2) चित्रपटाचा आकर्षक आणि मनोरंजक ट्रेलर रिलीज झाला आहेत. याच ट्रेलरवरुन मुंबई पोलिसांना (Mumbai Police) एक कल्पना सुचली आहे. चित्रपटात अभिनेता आयुष्मान खुरानाची (Ayushmann Khurrana) विचित्र आणि मनोरंजक भूमिका दाखवण्यात आली आहे. यावरुनच मुंबई पोलिसांना कल्पना सुचली आहे. मुंबई पोलिसांनी या चित्रपटातील गाण्याचा वापर करून वाहतुकीबाबत जनजागृती केली आहे.
सोमवारी मुंबई पोलिसांनी इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. पोलिसांनी ट्रॅफिक नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी 'ड्रीम गर्ल' चित्रपटातील अल्पावधीतच प्रसिद्ध झालेलं गाणं 'दिल का टेलीफोन'चा वापर केला आहे.
'दिल का टेलीफोन' या गाण्याचा वापर वाहतुकीच्या नियमांसंदर्भात जनजागृती करण्यासाठी केला आहे. वाहतूक पोलिसांकडून, तसेच मुंबई पोलिसांकडून वारंवार गाडी चालवताना फोनवर बोलू नका अशी जनजागृती केली जाते. तसेच, गाड्या चालवताना फोनवर बोलणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी अनेकदा दंडही आकारला जातो. पण तरिही अनेकजण गाड्या चालवताना सर्रास फोनवर बोलताना दिसतात.
मुंबई पोलिसांनी 'दिल का टेलीफोन' गाण्यासह तयार केलेला एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती फोन बोलत बोलत गाडी चालवताना दिसत आहे. वाहतुकीचे नियम मोडणारी ही व्यक्ती गाडी चालवत असतानाच अचानक समोर ट्रॅफिक पोलीस येतात. त्यांना पाहुन ही व्यक्ती डचकते आणि तात्काळ तिथून पळ काढण्यासाठी रस्ता बदलते. पण त्या धावपळीत त्या व्यक्तीचं काय होतं, हे व्हिडीओमध्ये तुम्हीच पाहा...
View this post on Instagram
मुंबई पोलिसांनी 'ड्रीम गर्ल 2' मधील एका डायलॉगसह हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना मुंबई पोलिसांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "ड्रीम गर्लचा कॉल? याला सर्वांसाठीच एक वाईट स्वप्न नका बनवू! आज ते आपल्या आयुष्याचा सर्वात खतरनाक परफॉर्मन्स द्यायला चालले आहेत?" परिणाम अत्यंत घातक असतील! ड्रीम गर्ल सोबत जगण्याचे स्वप्न 'भंग' होऊ देऊ नका #धोक्याची_घंटा #DontAvoidWarningBells #CallOfSafety #RoadSafety
जनजागृतीसाठी मुंबई पोलिसांनी उचललेल्या पावलाचं सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच सोशल मीडियावरही नेटकऱ्यांकडून मुंबई पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान, अभिनेता आयुष्मान खुरानाचा 'ड्रीम गर्ल 2' हा 'ड्रीम गर्ल' चित्रपटाचा सीक्वल आहे. 2019 मध्ये 'ड्रीम गर्ल' चित्रपट रिलीज करण्यात आला होता. ज्या प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं होतं.