BJP Morcha : बुलढाणा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपचा आजचा मोर्चा रद्द, ठाकरे गट मात्र मोर्चावर ठाम
BJP Morcha Cancelled : बुलढाणा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपचा आजचा मोर्चा रद्द करण्यात आला आहे, तर ठाकरे गट आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यावर ठाम आहे.

Maharashtra Politics News : बुलढाणा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) आजचा मोर्चा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दुर्घटनेवर शोक व्यक्त करत मोर्चा रद्द केल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे भाजपचा मुंबईकरांचा आक्रोश आंदोलन आजच्या दिवशी स्थगित करण्यात आलं आहे. मुंबईकरांना ज्यांनी गेल 25 वर्ष लुटलं त्यांना प्रश्न विचारणारं आंदोलन आजच्या दिवशी स्थगित केलं असलं तरी आम्ही त्यांना प्रश्न विचारत राहू अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली आहे. तर दुसरीकडे मुंबई पालिकेवर धडक मोर्चा काढण्यावर ठाकरे गट (Thackeray Group) ठाम आहे.
'बुलढाणा दुर्घटना ह्रदयद्रावक'
शेलार यांनी पुढे म्हटलं आहे की, 'बुलढाणा दुर्घटना ह्रदयद्रावक आहे. 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांच्या कुटंबियांसोबत आमच्या संवेदना आहेत. अशा दु:खद दिवशी या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आजचा भाजपचा आक्रोश मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.' गेल्या 25 वर्षात सत्तेत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जो कथित भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे, त्याची पोलखोल म्हणून हा मोर्चा काढण्यात येणार होता, मात्र आता तो रद्द करण्यात आला आहे.
मोर्चा काढण्यावर ठाकरे गट ठाम
दरम्यान, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वात आज ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हेही या मोर्चात सहभागी होणार आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडूनही मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण, बुलढाणामधील भीषण बस अपघातानंतर भाजपने मोर्चा रद्द केला आहे. ठाकरे गटाविरोधात आज मुंबई भाजपकडून दोन मोर्चे काढण्यात येणार होते. पण बुलढाणा येथे दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोर्चा रद्द केला आहे.
बुलढाणा बसचा अपघातात 25 प्रवाशांचा मृत्यू
बुलढाण्यात (Buldhana) एका प्रवासी बसचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली. यामध्ये 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 32 प्रवासी होते. यातील आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर हा अपघात झाला आहे. ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. त्यावेळी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
लोखंडी खांबाला धडकून अचानक स्फोट, 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू; विदर्भ ट्रॅव्हल्सचा अपघातापूर्वीचा EXCLUSIVE Video
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
