एक्स्प्लोर

गुजरात बेस्ट बेकरी हत्याकांड प्रकरणी आज मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल; दोन आरोपींविरोधात 21 वर्षांनी फैसला

Best Bakery case in Gujrat: गुजरातमधील बेस्ट बेकरी हत्याकांड प्रकरणी आज मुंबई सत्र न्यायालय निकाल सुनावणार आहे. तब्बल 21 वर्षांनी दोन आरोपींविरोधात न्यायालय फैसला सुनावणार आहे.

Best Bakery case in Gujarat: बहुचर्चित बेस्ट बेकरी हत्याकांड (Best Bakery case in Gujarat) प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयातील (Mumbai Sessions Court) विशेष कोर्ट आज (4 मार्च) आपला फैसला सुनावणार आहे. साल 2002 मध्ये गुजरात दंगली (Gujarat Riots 2002) दरम्यान, घडलेल्या या हिंसाचाराच्या घटनेत जमावाने 14 जणांची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणातील दोन आरोपी हर्षद राजीवभाई सोलंकी आणि मफत मणिलाल गोहील गेल्या 10 वर्षांपासून कारागृहात आहेत. 13 डिसेंबर 2013 त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं होतं. त्यांच्याबाबत कोर्ट आज आपला निकाल देणार आहे. 

प्रकरण नेमकं काय? 

गोध्रा घटनेनंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीत वडोदरा येथील बेस्ट बेकरी जमावाच्या हल्ल्यात जाळून टाकण्यात आली होती. ज्यात 14 जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बेकरी मालकाची मुलगी झहिरा शेख हिच्या तक्रारीवरुन 21 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. याप्रकरणी साल 2003 मध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाने सर्व आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्ताता केली होती. या खटल्यात झहिरा शेखसह अनेक साक्षीदारांना कोर्टाने फितूर घोषित केलं होतं. पुढे सत्र न्यायालयाचा हा निकाल गुजरात हायकोर्टानेही कायम ठेवला होता.

त्यानंतर सामाजिक कार्यकर्ता तिस्ता सेटलवाड यांच्या मदतीने झहिराने या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी पुन्हा खटला चालवण्याचे निर्देश देत हे प्रकरण गुजरातबाहरे चालवण्याचे निर्देश देत ते मुंबईत वर्ग केलं होतं.

कोण आहेत दोन आरोपी? 

दरम्यानच्या काळात वडोदरा कोर्टाने फरार घोषित केलेल्या सोलंकी आणि गोहिल यांच्यासह अन्य दोघांना तपासयंत्रणेनं अजमेर ब्लास्ट परकरणी अटक केली. मुंबईत चालवलेल्या खटल्यात या दोन्ही आरोपींना फरार म्हणून घोषित करण्यात आलं होतं. मुंबई कोर्टाने याप्रकरणी 21 पैकी 9 जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. हा निकाल येईपर्यंत अनेक आरोपींचा मृत्यू झालेला होता.

या दोन्ही आरोपींनी आपल्याविरोधात इतर 19 जणांसोबत बडोदा, गुजरात येथील फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून साल 2003 मध्येच दोषमुक्त करण्यात आल्याचा दावा केला आहे. आरोपींचे वकील प्रकाश साळशिंगीकर आणि संजीव पुनाळेकर यांचा दावा आहे की, सरकारी पक्ष याप्रकरणी दोघांचे आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरला आहे. या दोघांविरोधात एकूण 10 साक्षीदार सादर करण्यात आले होते. यापैकी चार हे प्रत्यक्षदर्शी होते, मात्र केवळ तीनच साक्षीदार कोर्टापुढे हजर झाले. त्यापैकी एकानेही आरोपींना कोर्टात ओळखलं नाही. एकाने गोहीलला ओळखलं मात्र तो त्याचं नाव सांगू शकला नाही, तसेच त्याने साल 2002 मध्ये त्या दिवशी नेमकं काय केलं होत? हे देखील सांगू शकला नाही. तेव्हा आरोपींचे वकील प्रकाश साळशिंगीकर यांनी कोर्टात दावा केला आहे की, आरोपी आणि साक्षीदार हे एकमेकांच्या शेजारीच राहत होते. त्यामुळे 21 वर्षांनंतरही ते नजरेने एकमेकांना ओळखत असतील. मात्र त्याने त्यांच्यावरील आरोप सिद्ध होत नाहीत. तेव्हा आज कोर्ट याप्रकरणी काय निकाल देत, यावर या दोन आरोपींचं भवितव्य अवलंबून आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : लोकल  ते ग्लोबल, सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात तेजी, गुंतवणुकीची चांगली संधी...
Gold Silver Rate : लोकल  ते ग्लोबल, सोन्याचे दर घसरले, गुंतवणुकीची चांगली संधी...
Sharad Pawar & Ajit Pawar : शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
Sharad Pawar:  शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :  12 डिसेंबर 2024:  ABP MajhaRohit Pawar on Ajit Pawar : राजकारणापलिकडचे संबंध, हीच तर आपली चांगली संस्कृतीYugendra Pawar on Sharad Pawar : ही भेट कौटुंबिक, कुटुंब एकत्र आलं पाहिजेAjit Pawar on Cabinet Expansion : बहुतेक 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार - अजित पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : लोकल  ते ग्लोबल, सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात तेजी, गुंतवणुकीची चांगली संधी...
Gold Silver Rate : लोकल  ते ग्लोबल, सोन्याचे दर घसरले, गुंतवणुकीची चांगली संधी...
Sharad Pawar & Ajit Pawar : शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
Sharad Pawar:  शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
Kurla BEST Bus Accident: 'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
Video : भारताचे युवा खेळाडू भर मैदानात एकमेकांशी भिडले, नितीश राणा-आयुष बदोनीच्या वादात अखेर पंचांची मध्यस्थी, पाहा व्हिडीओ
नितीश राणा-आयुष बदोनी यांच्यात भरमैदानात वाद, अम्पायरची मध्यस्थी, पाहा व्हिडीओ
Sushma Andhare: परभणीत कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी पिढ्या बर्बाद करण्याचा प्रयत्न? सुषमा अंधारेंचे सरकारवर ताशेरे
परभणीत कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी पिढ्या बर्बाद करण्याचा प्रयत्न? सुषमा अंधारेंचे सरकारवर ताशेरे
Sharad Pawar & Ajit Pawar: अजित पवारांनी शरद पवारांची भेट का घेतली, भाजपला मोठा मेसेज देण्याचा प्रयत्न?
शरद पवारांची भेट घेऊन अजितदादांनी एकदा दगडात अनेक पक्षी मारले , नेमका कोणता पॉलिटिकल मेसेज दिला?
Embed widget