एक्स्प्लोर

Tirupati Balaji Temple : उलवे येथील तिरुपती बालाजी मंदिराचे भूमिपूजन रद्द, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार होते भूमिपूजन

नवी मुंबईतील उलवे येथे भव्य असे बालाजी मंदिर (Tirupati Balaji Temple) उभारण्यात येणार आहे. त्याचा भूमिपूजन सोहळा उद्या होणार होता. मात्र, तो रद्द झाला आहे.

Tirupati Balaji Temple : प्रसिद्ध देवस्थान तिरुपती बालाजी संस्थानाकडून नवी मुंबईतील उलवे येथे भव्य असे बालाजी मंदिर (Tirupati Balaji Temple) उभारण्यात येणार आहे. 10 एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या बालाजी मंदिराचा भूमिपूजन सोहळा उद्या (21 ऑगस्ट) होणार होता. यासाठी मंडप उभारुन जय्यत तयारीही सुरु करण्यात आली होती. मात्र सीआरझेड भागात सिडकोने भूखंड दिल्यानं केंद्रीय हरित लवादाने याची चौकशी लावल्याने हा भूमिपूजन सोहळा रद्द झाला असल्याचे समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा उद्या पार पडणार होता.

Tirupati Balaji Temple : उलवे येथील तिरुपती बालाजी मंदिराचे भूमिपूजन रद्द, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार होते भूमिपूजन

सिडकोने 10 एकराची जागा बालाजी मंदिरासाठी दिली असली तरी ही सिआरझेड एक मध्ये मोडत आहे. खाडी किनारी मॅंग्रोजला लागून हा भूखंड असल्यानं इथे बांधकाम करण्यास परवानगी नसल्याचे सांगत पर्यावरण प्रेमींनी विरोध केला होता. याबाबत नेट कनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे लेखी तक्रार केली होती. केंद्रीय पर्यावरण विभागाने आलेल्या तक्रारी दखल घेत चौकशी करण्याचे आदेश एमसीझेडएमए विभागाला दिले आहेत. सीआरझेडमध्ये येणाऱ्या भूखंडाची केंद्रीय पर्यावरण विभागाने चौकशी लावल्याने उद्या होणारा भूमिपूजन सोहळा राज्य सरकारने रद्द केला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळं सिडकोने चुकीच्या ठिकाणी भूखंड दिल्यानेच भूमिपूजन सोहळा रद्द करण्याची नामुष्की तिरुपती बालाजी मंदिर संस्थानावर आली असल्याचे समोर येत आहे.

Tirupati Balaji Temple : उलवे येथील तिरुपती बालाजी मंदिराचे भूमिपूजन रद्द, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार होते भूमिपूजन

सिडको 10 एकरची जागा बालाजी मंदिरासाठी दिली होती. पण यावर आमचा यावर आक्षेप आहे.  कारण हे क्षेत्र सिआरझेडचे आहे. अशा जागेवर बांधकाम करता येत नसल्याची माहिती नेट कनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी दिली आहे. मंदिर असो, मस्जिद असो किंवा इमारती असो अशी बांधकाम या जागेत होत नसल्याची माहिती बी. एन. कुमार यांनी दिली. ही जागा मोकळी ठेवायला पाहिजे, कारण किनारपट्टीचे रक्षण होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा पर्यावरणाचे रक्षण करायला पाहिजे असे सांगतिले आहे. मुख्यमंत्रीसुद्धा पर्यावरणाच्या रक्षणाबाबत बोलतात मग ही जागा मंदिरासाठी कशी देता येईल असेही  बी. एन. कुमार म्हणाले. मंदिराला आमचा विरोध नाही. लोकांना पुकरायला धार्मिक कार्यक्रमासाठी मंदिर हवे आहे. पण दुसऱ्या ठिकाणी सरकारनं जागा द्यावी असेही ते म्हणाले.  

महत्त्वाच्या बातम्या:

शिर्डी साई संस्थान, तिरुपती बालाजी देवस्थानसह देशभरातील सहा हजार अशासकीय संस्थांचं विदेशी चलन खातं गोठवलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ravindra Waykar on EVM : ईव्हीएमसोबत छेडछाड केल्याचा प्रश्नच येत नाही, रवींद्र वायकरांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 04 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRavindra Waykar : मंगेश पडिलकरजवळचा फोन निवडणूक अधिकाऱ्याचा? ड्रायव्हर बोलवण्यासाठी फोन वापरल्याचा दावाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
Embed widget