एक्स्प्लोर
पनवेल महापालिकेच्या आयुक्तांना जीवे मारण्याची धमकी
वेळ पडल्यास तोंडाला काळे फासू आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचीही धमकी या पत्रातून देण्यात आली आहे.

नवी मुंबई : पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हे पत्र नेमकं कुणी पाठवलं, हे अद्याप कळू शकलेलं नाही. महापालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांच्यासह उपायुक्त समीर लेंगरेकर आणि सहाय्यक आयुक्त संध्या बालनकुळे यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. “नगरसेवकांचे ऐका. शिवाय नगरसेवकांचे अधिकार संपवू नका. झोपडपट्ट्यांवर कारवाई करु नये, पालिकेतील ठेकेदारांवर कारवाई करु नये.” अशा धमक्या या पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत. शिवाय, वेळ पडल्यास तोंडाला काळे फासू आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचीही धमकी या पत्रातून देण्यात आली आहे. सुधाकर शिंदे कोण आहेत? सुधाकर शिंदे हे पनवेल महापालिकेचे विद्यामान आयुक्त आहेत. पनवेल महापालिकेची स्थापना झाल्यानंतर त्यांची नियुक्ती झाली. राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचे ते बंधू आहेत. संबंधित बातमी : सुधाकर शिंदे पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदी
आणखी वाचा























