एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
बाप टकटक गँगचा म्होरक्या, मुलं डॉक्टर-इंजिनिअर
टकटक गँगचा म्होरक्या रविचंद्रन मुदलियारचा एक मुलगा मरिन इंजिनिअर, तर दुसरा नवी मुंबईतील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये सर्जन, तर तिसरा मुलगा हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेत आहे.
![बाप टकटक गँगचा म्होरक्या, मुलं डॉक्टर-इंजिनिअर Thief Father is Leader of Taktak Gang, Sons Doctor and Engineer latest update बाप टकटक गँगचा म्होरक्या, मुलं डॉक्टर-इंजिनिअर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/03/29204437/Jail.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
प्रातिनिधिक फोटो
मुंबई : 'टकटक गँग'चा म्होरक्या रविचंद्रन मुदलियारच्या पोलिस चौकशीत अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत. मुदलियारचा एक मुलगा मरिन इंजिनिअर, तर दुसरा नवी मुंबईतील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये सर्जन आहे. तिसरा मुलगा हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेत आहे.
मुदलियार आधी चौकशीत केवळ तमिळ भाषेत पोलिसांना उत्तर देत होता. कोणतीही माहिती न दिल्यास तुझ्या तिन्ही मुलांना समन्स बजावण्यात येईल, अशा शब्दात पोलिसांनी त्याला खडसावलं आणि त्याची पोपटपंची सुरु झाली. चौकशी त्याने आपल्या उच्चशिक्षित मुलांविषयी माहिती दिली.
मुदलियारची बायको आणि तीन मुलं नवी मुंबईत राहतात, मात्र तो त्यांच्यासोबत राहत नव्हता. सध्या त्याची रवानगी आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली आहे.
टकटक गँग काय करते?
एखाद्या गाडीच्या काचेवर टकटक करायचं आणि ड्रायव्हरला गाडीतून ऑईल लीक होत असल्याचं सांगायचे. ड्रायव्हर चेक करायला खाली उतरला की गँगचे दुसरे मेंबर गाडीतील महागडे मोबाईल आणि इतर वस्तू चोरायचे.
अलिकडेच दक्षिण मुंबईतील एका ज्वेलरी डिझायनर महिलेनं टकटक गँगविरोधात अशाच प्रकारच्या चोरीची तक्रार पोलिसांकडे केली होती.
मुंबईत टकटक गँगचा धुमाकूळ : जितेंद्र आव्हाड
मुदलियार अनेक दिवस पायधुनी पोलिसांना काहीच थांगपत्ता लागू देत नव्हता. तेव्हा पोलिसांनी त्याच्या कुटुंबाची माहिती काढली. त्यात त्याची मुलं उच्चशिक्षित असल्याचं पोलिसांना समजलं.
पोलिसांनी धाकदपटशा दाखवल्या मुदलियार रडायला लागला आणि हिंदीत बोलायला लागला. मुदलियार अनेक मोठ्या चोरीच्या घटनांमध्ये वॉंटेड आहे. मार्च 2017 मध्ये धारावीत एसबीआय एटीएमबाहेर उभ्या असलेल्या कॅश व्हॅनमधून 1.6 कोटी चोरल्याचा आरोपही मुदलियारवर आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)