एक्स्प्लोर

आरेच्या कारशेडला विरोध करणाऱ्यांनो गैरसमजुती दूर करा : आयुक्त प्रविणसिंह परदेशी

गोरेगावच्या आरे वसाहतीमध्ये होणाऱ्या मेट्रो-3 मार्गिकेच्या कारशेडसंदर्भात मुंबईकरांमध्ये नकारात्मक गैरसमजुती पसरविण्यात येत असल्याचे मत मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी मांडले आहे.

मुंबई : गोरेगावच्या आरे वसाहतीमध्ये होणाऱ्या मेट्रो-3 मार्गिकेच्या कारशेडसंदर्भात मुंबईकरांमध्ये नकारात्मक गैरसमजुती पसरविण्यात येत असल्याचे मत मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी मांडले आहे. एसएनडीटी महाविद्यालयात सोमवारी झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. 'एसएनडीटी' महिला विद्यापीठाकडून 'मेट्रोचा पर्यावरणीय परिणाम' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात परदेशी यांच्यासोबत 'मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळा'च्या (एमएमआरसीएल) संचालिका अश्विनी भिडे, 'वनशक्ती' या पर्यावरणीय संस्थेचे डी.स्टॅलिन आणि वृक्षप्रेमी झोरु बाथेना सहभागी झाले होते. आरेतील कारशेडच्या जागेसंदर्भात पर्यावरणवाद्यांकडून सादर करण्यात येणारी कागदपत्रे महत्त्वाची असली, तरी त्यांची सत्यता पडताळणे आवश्यक असल्याचे यावेळी परदेशी यांनी सांगितले. 'मेट्रो-3'च्या कारशेडसाठी महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने कारशेडसाठी दोन हजार 700 झाडांना तोडण्याचा निर्णय दिला आहे. तेव्हापासून वृक्षप्रेमींनी ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली. या मुद्याला अनुसरुन 'एसएनडीटी' विद्यापीठाने मेट्रोच्या पर्यावरणीय परिणामांबाबत चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चसत्रात प्रथमच मेट्रो प्रकल्पातील अधिकारी आणि आरेतील कारशेडला विरोध करणारे पर्यावरणवादी एकमेकांसमोर आले. यावेळी पर्यावरणवाद्यांनी उपस्थित केलेल्या सर्व शंकाना पालिका आयुक्त परदेशी आणि अश्विनी भिडे यांनी उत्तर देण्याबरोबरच 'एसएनडीटी'च्या विद्यार्थिनींनी विचारलेल्या कारशेडसंदर्भातील प्रश्नांचे निराकरण केले. यावेळी डी.स्टेलिन व झोरू बाथेना या दोघांनी कारशेडसंदर्भात कांजुरमार्गच्या जागेचा पर्याय, आरे हे जंगल असल्याचा दावा आणि कारशेडच्या भविष्यातील वापर, असे अनेक प्रश्न उपस्थित केले. मुंबईच्या एकूण क्षेत्रफळापैकी केवळ 30 टक्के जागा ही विकासाकरिता उपलब्ध असून आरेची जागा ही मुळातच दुग्धविकास विभागाची म्हणजे शासनाची असल्याचे परदेशी यांनी या चर्चासत्रात सांगितलं. दुग्धविकास विभागाने या जागा कुरण वाढवून गुरांना चरण्यासाठी मोकळ्या ठेवल्या. त्यामुळे त्याठिकाणी दिसणारी हिरवळ जंगल कशी असू शकते? असा सवाल परदेशी यांनी पर्यावरणवाद्यांना विचारला. तर कारशेडच्या जागेचा वापर कोणत्याही प्रकारे व्यावसायिकरणासाठी करणार नसून उलटपक्षी त्यामधील 5 हेक्टर जागेवरील वृक्ष अबाधित ठेवणार असल्याचे स्पष्टीकरण 'एमएमआरसीएल'च्या संचालिका अश्विनी भिडे यांनी दिले. पर्यावरणवाद्यांकडून उपस्थित केला जाणाऱ्या मिठी नदीच्या पुरपरिस्थितीचा मु्द्यावर बोलताना भिडे यांनी सांगितले की, 'कारशेडच्या जागेवर मिठीच्या पुराचे पाणी येते, याविषयी दुमत नाही. मात्र त्यासाठी कारशेडच्या 75 टक्के क्षेत्राचे सिमेंटीकरण करण्यात येणार नाही. याबरोबरच पुराचे पाणी बाहेर काढण्यासाठी पर्जन्यजल निसारण यंत्रणा उभारण्यात येणार आहे'. तसेच सध्या कारशेडच्या जागेपैकी 17 टक्के क्षेत्र हे वृक्षांनी आच्छादलेले असून उर्वरित क्षेत्रावर गवत असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Embed widget