Bird Flu | बर्ड फ्लूसाठी ठाणे महानगरपालिकेचा नियंत्रण कक्ष, मृत पक्षांची माहिती तात्काळ देण्याचे महापौर-आयुक्तांचे आवाहन
नागरिकांनी मृत पक्ष्यांची माहिती मिळताच तात्काळ नियत्रंण कक्षाला कळवण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.
![Bird Flu | बर्ड फ्लूसाठी ठाणे महानगरपालिकेचा नियंत्रण कक्ष, मृत पक्षांची माहिती तात्काळ देण्याचे महापौर-आयुक्तांचे आवाहन Thane Municipal Corporation Control Room for Bird Flu, Mayor-Commissioner's Appeal for Immediate Information of Dead birds Bird Flu | बर्ड फ्लूसाठी ठाणे महानगरपालिकेचा नियंत्रण कक्ष, मृत पक्षांची माहिती तात्काळ देण्याचे महापौर-आयुक्तांचे आवाहन](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/11222528/thane.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ठाणे : भोपाळ येथील एनआयएचएसएडी येथे महाराष्ट्रातून एव्हीयन इन्फ्लूएन्झा चाचणीसाठी प्राप्त नमुन्यांचा प्रयोग शाळेतून प्राथमिक निकाल समोर आला आहे. ठाण्यातील 3 पाण बगळे आणि 1 पोपट बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आल्याचा अहवालात स्पष्ट झाले आहे. याबाबत मात्र ठाणे महानगरपालिकेकडे याचा अहवाल आला नसल्याचे पालिका अधिकारी यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे पालिकेच्या वतीने बर्ड फ्लूमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये तसेच नागरिकांना योग्य माहिती मिळावी यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
नागरिकांनी मृत पक्ष्यांची माहिती मिळताच तात्काळ नियत्रंण कक्षाला कळवण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नागरिकांनी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष येथील टोल फ़्री 1800 222 108 तसेच 022 -25371010 या हेल्पलाईनवर माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव
राज्यात बर्ड फ्लूनंही शिरकाव केला आहे. रविवारी परभणीच्या मुरुंबा गावातील 800 पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूनेच झाला असल्याचं स्पष्ट झालं होतं. अशातच आता परभणीपाठोपाठ मुंबई, ठाणे, बीड, तसेच रत्नागिरीतील दापोलीतही बर्ड फ्लू पोहोचल्याचं निष्पन्न झालं आहे.
बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात रॅपिड रिस्पॉन्स टीम तैनात
राज्य अगोदरच कोरोनच्या संकटाशी सामना करत आहे, अशातच आता नवीन संकट उभं राहिलंय, ते बर्ड फ्लूच्या रूपात. परभणीच्या मुरुंबा गावातील 800 पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूनेच झाला असल्याचं स्पष्ट झालं असून बीड आणि लातूर मधील अहवाल अद्याप प्रतिक्षेत आहेत. दरम्यान राज्य शासनाने या घटनेनंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात रॅपिड रिस्पॉन्स टीम नियुक्त केल्या आहेत. तसचे ग्रामपंचायत, वन विभाग, पाटबंधारे विभाग पातळींवर निगराणीचे आदेशही दिले आहेत.
संबंधित बातम्या :
- परभणीत बर्ड फ्लू; बीड, लातूरचे अहवाल प्रतिक्षेत, प्रत्येक जिल्ह्यात रॅपिड रिस्पॉन्स टीम तैनात
- Bird Flu in Maharashtra | मुरूंबा येथील आठशे कोंबड्यांचा मृत्यू 'बर्ड फ्लू'मुळेच; परभणी जिल्हा प्रशासनास अहवाल प्राप्त
- Bird Flu Symptoms | बर्ड फ्लूची लक्षणं अन् कारणं; avian influenza व्हायरस माणसांसाठीही धोकादायक?
- Bird Flu India 2021 | सध्याच्या परिस्थितीत पोल्ट्री उत्पादनं खरेदी, सेवन करणं सुरक्षित आहे का?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)