Bird Flu in Maharashtra | मुरूंबा येथील आठशे कोंबड्यांचा मृत्यू 'बर्ड फ्लू'मुळेच; परभणी जिल्हा प्रशासनास अहवाल प्राप्त
दोन दिवसांपूर्वी मुरुंबा गावातील 800 कोंबड्यांचा अज्ञात रोगाने मृत्यू झाला होता. या कोंबड्यांचा मृत्यू 'बर्ड फ्लू'मुळेच झाला असल्याचं निष्पन्न झालं आहे.
![Bird Flu in Maharashtra | मुरूंबा येथील आठशे कोंबड्यांचा मृत्यू 'बर्ड फ्लू'मुळेच; परभणी जिल्हा प्रशासनास अहवाल प्राप्त Bird Flu in Maharashtra Bird flu kills 800 chickens in Murumba Received report to Parbhani district administration Bird Flu in Maharashtra | मुरूंबा येथील आठशे कोंबड्यांचा मृत्यू 'बर्ड फ्लू'मुळेच; परभणी जिल्हा प्रशासनास अहवाल प्राप्त](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/06233707/Bird-flue.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
परभणी : परभणी तालुक्यातील मुरुंबा येथील मृत्यु पावलेल्या त्या 800 कोंबड्याचा मृत्यू 'बर्ड फ्लू'मुळेच झाला असल्याची माहिती समोर येत आहे. हा अहवाल भोपाळ येथील प्रयोग शाळेने जिल्हा प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे मुरुंबा गाव संसर्गित झाल्याचे जाहीर करून बर्ड फ्लूच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याची कारवाई उद्यापासून करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितलं आहे.
परभणीतील मुरुंबा गावाच्या एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या नष्ट करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत. गावाच्या 10 किलोमीटर परिसरात पक्ष्यांच्या खरेदी-विक्रीसह अवागमनास निर्बंध जारी केले आहेत.पाहा व्हिडीओ : परभणीच्या मुरुंबा येथील 800 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच
दोन दिवसांपूर्वी मुरुंबा गावातील 800 कोंबड्यांचा अज्ञात रोगाने मृत्यू झाला होता. जिल्हा प्रशासन, पशुसंवर्धन विभागाने तत्काळ गावात धाव घेऊन उपायोजना करित पक्षांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. तिथून हे नमुने भोपाळ येथील प्रयोग शाळेत पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल रविवारी रात्री उशिरा जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला. त्यात 'बर्ड फ्लू' मुळेच कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान,गावात उपाययोजना करण्यात येत आहेत. एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले असून गावातील दहा किलोमीटर परिसरात कुकूट पक्ष्यांची खरेदी, विक्री, वाहतूक, बाजार आणि जत्रा, प्रदर्शन तसेच पशुपक्ष्यांच्या अवागमनास बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Bird Flu Symptoms | बर्ड फ्लूची लक्षणं अन् कारणं; avian influenza व्हायरस माणसांसाठीही धोकादायक?
Bird Flu India 2021 | सध्याच्या परिस्थितीत पोल्ट्री उत्पादनं खरेदी, सेवन करणं सुरक्षित आहे का?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)