एक्स्प्लोर
Advertisement
ठाण्यात शिक्षकावर तलवार हल्ला, सुपारी देणारा मुख्याध्यापक फरार
शाळेत फक्त सही करुन मुख्याध्यापक रमेश मिश्रा पळून जात असल्याची तक्रार शिक्षक महाजन प्रजापती यांनी केली होती.
ठाणे : ठाण्याच्या ज्ञानोदय शाळेतील शिक्षकावर तलवारीने हल्ला करणाऱ्या तीन जणांना अटक करण्यात आली आहे. तिन्ही आरोपींना शाळेतील मुख्याध्यापकाने 10 हजारांची सुपारी देऊन शिक्षकाला जीवे मारण्याची सुपारी दिली होती.
सुपारी देणारा मुख्याध्यापक आणि त्याचा मुलगा अद्याप फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. शाळेत फक्त सही करुन मुख्याध्यापक रमेश मिश्रा पळून जात असल्याची तक्रार शिक्षक महाजन प्रजापती यांनी केली होती. त्यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून प्रजापती यांच्या हत्येचा कट शिजत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
3 डिसेंबरला प्रजापती यांच्यावर तलवार आणि लोखंडी रॉडनं हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी मुख्यध्यापक रमेश मिश्रा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. शिक्षक प्रजापती यांच्या हत्येसाठी व्हॉट्सअॅपवर मुख्यध्यापक मिश्रा यांनी फोटो पाठवल्याची कबुली आरोपींनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
राजकारण
राजकारण
Advertisement