ठाण्यातील दिवावासीयांची लवकरच डम्पिंगच्या त्रासातून सुटका
दिव्याच्या डम्पिंग ग्राऊंडचं लवकरच स्थलांतर करण्यात येणार असून याबाबतचा विषय मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे.
![ठाण्यातील दिवावासीयांची लवकरच डम्पिंगच्या त्रासातून सुटका thane : Diva resident soon get relief from dumping problem ठाण्यातील दिवावासीयांची लवकरच डम्पिंगच्या त्रासातून सुटका](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/10/24200405/dumping-ground.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कल्याण : डम्पिंगच्या आगी आणि धुरामुळे त्रासलेल्या दिवावासीयांची लवकरच डम्पिंगच्या त्रासातून सुटका होणार आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी डम्पिंगला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर ही माहिती दिली आहे.
दिव्याच्या डम्पिंग ग्राऊंडचं लवकरच स्थलांतर करण्यात येणार असून याबाबतचा विषय मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर दिवा डम्पिंग ग्राउंड बंद करून दुसरीकडे स्थलांतरित करण्यात येईल, अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.
दिवा डम्पिंग ग्राऊंडला लागलेली आग नेमकी कशामुळे लागली? याचीही चौकशी होणार असल्याचं ते म्हणाले. दोन दिवसांपासून दिवा शहराला लागून असलेल्या डम्पिंग ग्राऊंडला मोठी आग लागली होती.
या आगीमुळे संपूर्ण दिवा शहरासह आजूबाजूच्या परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं होतं. सध्या ही आग आटोक्यात आली असून अग्निशमन दलाच्या वतीनं अजूनही डम्पिंग ग्राऊंडवर कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)