एक्स्प्लोर
पाणी जपून वापरा, ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार!
ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून ठाणे शहरात टप्याटप्याने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

ठाणे : पाणी पुरवठा बंद राहणार असल्यामुळे ठाणेकरांची अडचण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जपून पाणी वापरावं लागणार आहे. स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा बुधवारी (25 एप्रिल) सकाळी 9 ते गुरुवारी (26 एप्रिल) सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
दरम्यान, ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून ठाणे शहरात टप्याटप्याने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
बुधवारी म्हणजे आज सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत शहरातील घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ या परिसरात पाणी पुरवठा बंद राहिल.
बुधवारी रात्री 9 ते गुरुवार सकाळी 9 वाजेपर्यंत समतानगर, ऋतुपार्क, सिध्देवर, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर आणि कळव्याच्या काही भागातील पाणी पुरवठा बंद राहिल.
या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करावा, असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
