एक्स्प्लोर
शिवसेनेचे सर्व मंत्री बॅगा भरुन तयार आहेत: सुभाष देसाई
मुंबई: 'शिवसेनेच्या 12ही मंत्र्यांच्या बॅगा तयार आहेत. आम्ही फक्त आदेशाची वाट पाहत आहोत. शिवसैनिकांची इच्छा असेपर्यंतच आम्ही मंत्रिपदावर आहोत.' असं वक्तव्य शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी गोरेगावमधील शिवसेनेच्या मेळाव्यात केलं. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुभाष देसाईंचं हे वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहं.
'3 पायांची शर्यत आता खूप झाली, आम्ही एकटे महापालिकेवर भगवा फडकवायला समर्थ आहोत. शिवसैनिकांचीही तशीच इच्छा आहे. स्वबळावर लढा असा आदेश उद्धव ठाकरेंनी दिला तर 114 जागा जिंकल्याशिवाय आम्ही राहणार नाही.' असं म्हणत सुभाष देसाई यांनी 'एकला चलो रे'ची भूमिका मांडली.
'आज जो काही निर्णय होईल तो आर या पार होईल. मात्र हा निर्णय 'ऑन द स्पॉट' निर्णय असेल.' असंही सुभाष देसाई म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
शेत-शिवार
राजकारण
Advertisement