एक्स्प्लोर
Advertisement
शाळेत खेळाचं मैदान नाही.. विद्यार्थिनीच्या पत्राची मोदींकडून दखल
नवी मुंबईः खेळण्यासाठी मैदान नसल्याने पनवेलमधील नववीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं. विशेष म्हणजे मोदींनी या पत्राची दखल घेत थेट सिडकोला मैदान उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले आहेत.
साक्षी तिवारी असं मोदींना पत्र लिहिणाऱ्या विद्यार्थिनीचं नाव असून ती कळंबोलीतील न्यू मुंबई इंग्लिश स्कूलमध्ये शिकते. पण खेळण्यासाठी मैदान नसल्याने आम्ही खूप नाराज असल्याचं साक्षीने पत्रात लिहिलं. त्यानंतर मोदींनी पत्राची दखल घेत मैदान उपलब्ध करुन देण्याचे आदेश सिडकोला दिले आहेत.
पंतप्रधानांनी साक्षीच्या पत्राची दखल घेतल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. यापूर्वी देखील अनेक विद्यार्थ्यांनी मोदींना पत्र लिहिलं आहे. विशेष म्हणजे मोंदींकडून देखील या पत्रांची तातडीने दखल घेतली जाते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भारत
महाराष्ट्र
बीड
Advertisement