एक्स्प्लोर
मुंबई विमानतळावरील एन्ट्री फी दहा दिवसात बंद करा : शिवसेना
मुंबई : मुंबई विमानतळावर प्रवेश शुल्क वसुलीबाबत एबीपी माझाच्या बातमीनंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. दहा दिवसात टोल वसुली बंद करा, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करु, असा इशारा शिवसेनेने एअरपोर्ट ऑपरटिंग कंपनी जीव्हीकेला दिला आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबई विमानतळ परिसरात जर तुम्ही प्रवेश केला तर प्रत्येक फेरीवर एन्ट्री फीच्या नावाखाली 130 रुपये वसूल केले जातात. त्यासाठी तुम्हाला पार्किंग करायचीही गरज नाही. आत शिरताच तुमच्यावर टोलसक्ती लागू होते. मात्र टोल मागणाऱ्याकडे पावती पुस्तकाशिवाय कुठलंच उत्तर नसतं.
नियम धाब्यावर बसवून प्रवाशांची लूट
संपूर्ण देशात फक्त इथेच एअरपोर्ट ऑथरिटी आणि सिव्हिल एव्हिएशनचे नियम धाब्यावर बसवून प्रवाशांची रोज लाखोंना लूट होते, असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विश्वास भांबुरकर यांनी केला आहे.
आरोपांवर GVKचं म्हणणं काय?
- मुंबई विमानतळ अतिसंवेदनशील आहे. वाहनांच्या गर्दीमुळेच खासगी वगळता इतर वाहनांवर एन्ट्री टोल घेतला जातो.
- एअरपोर्ट ऑथरिटी आणि मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या करारानुसार टोल दर ठरवण्याचे सर्वस्वी अधिकार GVK कडे आहेत
- प्रवाशांसाठी खास इलेव्हटेड रोड बांधला गेला आहे. त्याच्या सेवेसाठी हजारो कर्मचारी असतात. एन्ट्री फीचा पैसा या सर्व देखभालीसाठी दिला जातो.
2014 साली एबीपी माझाच्याट बातमीनंतर सर्वपक्षीय आंदोलन होऊन ही टोलधाड बंद झाली होती. मात्र त्याच्या पुढच्याच वर्षी 20 रुपये वाढीव दरानं ती पुन्हा सुरु झाली.
खरंतर या टोल धाडीतून अनेक बड्या धेंडांची हितसंबंध जोपासले जात असल्याची चर्चा आहे. यात कंत्राटदार आणि कमर्शियल कंपन्यांचं फावतं. मात्र सर्वसामान्यांना ही लूट निमूटपणे सहन करण्याशिवाय पर्यायच उतर नाही.
पाहा व्हि़डीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement