एक्स्प्लोर
राज्याचं नवं गृहनिर्माण धोरण 2 सप्टेंबरला जाहीर होणार!
मुंबई : राज्याचं नवीन गृहनिर्माण धोरण येत्या 2 सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत घाटकोपरला जाहीर सभा होणार आहे. त्यावेळी नव्या गृहनिर्माण धोरणाची घोषणा केली जाणार आहे.
राज्याचं नवं गृहनिर्माण धोरण कसं असावं यासंदर्भात 'मातोश्री'वर कालच (शुक्रवार) उद्धव ठाकरे, शिवसेना मंत्री आणि गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीनंतरच गृहनिर्माण धोरणासंदर्भातला निर्णय घेण्यात आला.
राज्याचं गृहनिर्माण धोरण 'मातोश्री'वर ठरणार?
फेब्रवारी 2017 ला राज्यात 10 महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. याचा सर्वाधिक परिणाम मुंबई महापालिका क्षेत्रातील गृहनिर्माण प्रकल्पांवर होणार आहे. त्यामुळेच युती सरकार लोकप्रिय घोषणा करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement