एक्स्प्लोर

मुलाखतीआधी संजय राऊत आणि कुणाल कामरा यांची भेट!

राजकीय नेत्यांच्या मुलाखती घेणारे 'सामना'चे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मुलाखत स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा घेणार आहे. या निमित्ताने झालेल्या भेटीचा फोटो दोघांनी शेअर केला आहे.

मुंबई : एरव्ही मोठमोठ्या राजकीय नेत्यांच्या मुलाखती घेणारे 'सामना'चे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मुलाखत स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा घेणार आहे. आपल्या कार्यक्रमात सहभागी होण्याची विनंती कुणाल कामराने काही दिवसांपूर्वी केली होती. त्याचं आमंत्रण स्वीकारल्यानंतर रविवारी (4 ऑक्टोबर) दोघांची भेट झाली. या भेटीत दोघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाल्याचं समजतं.

येत्या शुक्रवारी 'शट अप या कुणाल' या पॉडकास्ट मुलाखतीचं चित्रीकरण पार पडणार आहे. या मुलाखतीआधी काल म्हणजेच 4 ऑक्टोबर रोजी दोघांची भेट झाली. त्या भेटीचा फोटो संजय राऊत आणि कुणाल कामरा या दोघांनीही आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करताना कुणाल कामराने 'शट अप या कुणाल 2.0' असं कॅप्शन दिलं आहे.

View this post on Instagram
 
Shut up ya kunal 2.0 🙏🙏🙏

A post shared by Kamra (@kuna_kamra) on

तर संजय राऊत यांनी 'मेट कुणाल कामरा टुडे' एवढंच कॅप्शन देत त्याच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे.

काही दिवसांपूर्वी कुणाल कामराने ट्वीट करुन संजय राऊत यांनी त्याच्या शोमध्ये सहभागी व्हावं, अशी इच्छा व्यक्त केली होती. 'संजय "राऊत सरांनी 'शट अप या कुणाल' या पॉडकास्टच्या दुसऱ्या पर्वाचे पहिले पाहुणे म्हणून सहभागी होण्याची तयारी दर्शवली, तरच मी ते पुन्हा सुरु करेन, अन्यथा शक्यता कमी आहे," असं त्याने ट्वीटमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर संजय राऊत यांनीही कुणालचं निमंत्रण स्वीकारलं. त्यांनी कुणालसोबत फोनवर या शोसंदर्भात बातचीत केली.

दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत आपल्या सडेतोड वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात. सध्या अभिनेत्री कंगना रनौत मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन संजय राऊतांनी तिच्यावर निशाणा साधला होता. संजय राऊतांनी सामनासाठी घेतलेली राजकीय नेत्यांची मुलाखतीची देशभर चर्चा असते, मग ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची. मात्र यावेळी राऊत मुलाखत घेताना नाही तर मुलाखत देताना दिसतील. संजय राऊत यांची मुलाखत कुणाल कामरा घेणार आहे.

स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने रमित वर्मासह 2017 मध्ये 'शट अप या कुणाल'ची सुरुवात केली होती. या शोमध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त पाहुण्यांना निमंत्रण देऊन त्यांच्याशी संवाद साधला जातो. शिवाय काही बातम्यांचे किंवा डिबेट शोमधील व्हिडीओ क्लिप्स, मजेदार व्हिडीओ दाखवून त्याबाबत काही प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या मुलाखतीत संजय राऊत काय बोलणार याची उत्सुकता आहे.

कुणाल कामराच्या या शोमध्ये याआधी एनडीटीव्हीचे रवीश कुमार, गीतकार जावेद अख्तर यांसारखे नामवंत व्यक्ती सहभागी झाले होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेपासून कोण वंचित राहणार?TOP 25 : आत्तापर्यंतच्या टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट : 02 July 2024UP Hathras Stampede : भोले बाबाच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी, 75 पेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget